रेल्वे मंत्रालय
व्यापार मेळाव्यात रेल्वेने केले आपल्या प्रदीर्घ बदलत्या कार्य प्रवासाचे प्रदर्शन
भारतीय रेल्वेने हाती घेतले विविध उपक्रम, रेल्वे कक्षाला भेट देण्याची सर्व वयोगटांसाठी संधी
Posted On:
23 NOV 2021 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात भारतीय रेल्वेने आपल्या प्रदीर्घ बदलत्या कार्य प्रवासाचे प्रदर्शन केले आहे.
व्यापर मेळाव्यात सहभागी 1500 प्रदर्शकांमध्ये भारतीय रेल्वेचाही समावेश आहे. आपल्या कामगिरीच्या प्रवासाचे वर्णन मनोरंजक मार्गाने करत, आपल्या राष्ट्रीय वाहतूक सेवेने कक्ष क्रमांक 11 येथे 'आत्मनिर्भर भारत' ही संकल्पना असलेले प्रदर्शन भरवले आहे. यात वंदे भारत एक्सप्रेस मॉडेलचे सादरीकरण केले आहे. ते एका रेल्वे गाडीच्या स्वरूपात आहे.
ही रेल्वेगाडी देशाची पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड एक्सप्रेस आहे. दिल्ली-कटरा, दिल्ली-वाराणसी मार्गावर ती सेवा देत असून लवकरच देशभरातील इतर स्थळांनाही जोडेल.
रेल्वे कक्षाचा दर्शनी भाग सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल रेल्वे स्थानकाच्या (बेंगळुरू) छताची प्रतिकृती आहे. ती कक्षाला अधिकच आकर्षक रूप देत आहे
यावेळी, भारतीय रेल्वेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत, याचमुळे सर्व वयोगटांसाठी रेल्वे कक्षाला भेट देणे फायदेशीर ठरणारे आहे.
रेल्वेबद्दलच्या प्रश्नमंजुषेसाठी संवादी पडद्याची (स्क्रीनची) व्यवस्था केली आहे. येथे कोणीही स्पर्धेत सहभागी होऊ शकतो आणि मनोरंजक वस्तू जिंकू शकतो.
कालका-शिमला विभागाचा आभासी वास्तववादी अनुभव ही देखील अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला चुकवून चालणार नाही. येथे अभ्यागतांना, खेळण्यातील रेल्वेगाडीच्या आभासी प्रवासाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारा हिरवाईने नटलेला आणि पर्वतरांगांचा अनुभव या विभागात घेता येईल.
टच स्क्रीन व्हिडिओ गॅलरीत आवडीच्या विषयावरील तुमच्या आवडीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.
"मिले सूर मेरा तुम्हारा" गाण्याची नवीन आवृत्ती स्टॉलवर प्रवेश करताच पाहुण्यांना भुरळ घालत आहे. अलीकडेच, ही नवीन आवृत्ती देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी गायली आहे. यात आपल्या देशाच्या समृद्ध संस्कृती आणि भाषेचे प्रदर्शन केले आहे.
भिंती आणि खांबांवर माहिती देणारे पडदे बसवून कक्ष माहितीपूर्ण बनवण्यात आले आहे. रेल्वेचे अलिकडचे उपक्रम आणि भविष्यातील योजनांबाबत एखादी व्यक्ती येथे स्वत:ला अद्ययावत करू शकते.
टच स्क्रीन व्हिडिओ गॅलरीत आवडीच्या विषयावरील तुमच्या आवडीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.
टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील 5 पदक विजेत्यांसह रेल्वेच्या खेळाडूंनी देशाला मिळवून दिलेले वैभव दर्शविणाऱ्या क्रीडा क्षेत्रासाठी एक विशेष समर्पित कोपरा ठेवण्यात आला आहे. तसेच एक चषक विभाग आहे, तिथे रेल्वेच्या खेळाडूंनी देशाला आणि रेल्वे कुटुंबाला मिळवून दिलेली सर्व बक्षिसे, पुरस्कार पाहता येईल.
साठ वर्षांपेक्षाही अधिकची समृद्ध ऐतिहासिक परंपरा असलेल्या भारतीय रेल्वे मासिकाला कक्षात विशेष स्थान दिले आहे. इथे इच्छुकांना भारतीय रेल (हिन्दी) आणि इंडीयन रेल्वेज् (इंग्लिश) या मासिकांचे ऑननाईन सदस्यत्व घेता येईल.
भारतीय रेल्वेच्या क्रांतीकारक परिवर्तनाचे दाखले देणारे विविध मॉडेल्स, प्रतिकृती रेल्वेने इथे मांडल्या आहेत.
- पुनर्विकसित गांधीनगर राजधानी स्थानक:
- पुनर्विकसित राणी कमलापती रेल्वे स्थानक (भोपाळ)
- वंदे भारत एक्सप्रेस
- प्रख्यात चिनाब पूल
- 12000 अश्वशक्ती इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह
- दार्जिलिंग हिमालयन रेल्वे
- विस्टाडोम पर्यटक डब्बा
- 3 टियर वातानुकुलित स्वस्त डब्बा
- नवीन सुधारित वस्तू डब्बा (NMGH)
- हमसफर एक्सप्रेस
- एक्स-क्लास स्टीम इंजिन
- तेजस एक्सप्रेस ट्रेन
- डब्ल्यूपी वाफेवरील लोकोमोटिव्ह आणि इतर मॉडेल्समध्ये BOXNHL वॅगन- भारतातील पहिली स्टेनलेस स्टील वॅगन आणि BTFLN वॅगन- कमी वजनाची पेट्रोलियम तेल आणि वंगण वाहून नेणारी टाकी वॅगन यांचाही समावेश आहे.
G.Chippalkatti/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774273)
Visitor Counter : 244