अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तिकर विभागाचे गुजरातमध्ये छापे

प्रविष्टि तिथि: 21 NOV 2021 12:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021

प्राप्तिकर विभागाने रसायनांचे उत्पादन करणाऱ्या आणि बांधकाम क्षेत्रात असलेल्या एका प्रमुख उद्योग समूहाच्या संकुलांवर 18-11-2021 रोजी छापे घातले आणि जप्तीची कारवाई केली. या शोधमोहिमेदरम्यान गुजरातमधील वापी आणि सारीगाम, सिल्वासा आणि मुंबईत देखील असलेल्या सुमारे 20 पेक्षा जास्त संकुलांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेदरम्यान कागदपत्रे, डायरीमधील नोंदी आणि डिजिटल डेटाच्या स्वरुपात खूप मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह पुरावे सापडले आहेत आणि त्यामधून या समूहाच्या बेहिशोबी उत्पन्नाची आणि विविध मालमत्तांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची माहिती मिळाली आहे.

या पुराव्यांमधून हे स्पष्ट दिसत आहे की उत्पादन कमी दाखवणे, मालाची प्रत्यक्ष डिलीव्हरी न घेता केलेली खरेदी फुगवून दाखवण्यासाठी खरेदीच्या बनावट पावत्यांचा वापर करणे, बनावट जीएसटी क्रेडीटचा लाभ घेणे, बनावट दलाली खर्च दाखवणे इत्यादी प्रकारच्या कार्यपद्धतींचा अवलंब करून कर चुकवण्यात आल्याचे या पुराव्यातून स्पष्ट दिसत आहे. या समूहाला स्थावर मालमत्ता व्यवहारात देखील अतिरिक्त पैसे मिळाले आहेत. या सर्व प्रकारच्या व्यवहारांमुळे बेहिशोबी रोख रक्कम जमा झाली आहे. या शोधमोहिमेदरम्यान स्थावर मालमत्तेमधील गुंतवणुकीसाठी रोखीच्या व्यवहारांचे आणि रोख कर्जाचे अनेक आक्षेपार्ह पुरावे मिळाले आहेत आणि ते जप्त करण्यात आले आहेत.

या शोधमोहिमेत सुमारे 2.5 कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि 1 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 16 बँक खाती निर्बंधांतर्गत ठेवण्यात आली आहेत.

तपासादरम्यान सापडलेली कागदपत्रे/पुरावे यांच्या प्राथमिक छाननीतून असे दिसत आहे की सुमारे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशोबी उत्पन्न मिळवण्यात आले होते.

याचा पुढील तपास सुरू आहे.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1773687) आगंतुक पटल : 272
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu