माहिती आणि प्रसारण मंत्रालय

इफ्फी 52 मध्ये ‘उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा


निवड झालेल्या विजेत्यांमध्ये बिहारमधील केवळ 16 वर्षांच्या प्रतिभावान तरुणाचा समावेश- माहिती आणि प्रसारणमंत्र्यांची माहिती

75 सर्जनशील प्रतिभावंतांमध्ये भारतामधील अनेक लहान शहरे आणि नगरांमधील उमेदवारांचा समावेश

Posted On: 20 NOV 2021 9:30PM by PIB Mumbai

पणजी, 20 नोव्‍हेंबर 2021 


देश आपल्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत असल्याच्या पार्श्वभूमीवर,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा  ध्वज देशातील प्रत्येक राज्यात फडकत असताना, विशेष अतिथी म्हणून इफ्फीमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून 75 युवा उदयोन्मुख  चित्रपटकारांची “उद्याची 75  सर्जनशील मने “ उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल बोलताना मंत्री म्हणाले, “ भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करताना आम्ही पहिल्यांदाच 75 तरुण उदयोन्मुख गुणवंतांची निवड करणार आहोत आणि त्यांना मार्गदर्शन उपलब्ध करणार आहोत. त्यांची निवड प्रमुख परीक्षक आणि निवड परीक्षकांकडून अतिशय बारकाईने केलेल्या निवड प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.” यामध्ये निवडण्यात आलेला सर्वात तरुण उमेदवार केवळ 16 वर्षांचा आहे, बिहारमधील 16 वर्षांच्या आर्यन खानची निवड त्याच्या चित्रपट दिग्दर्शनातील कौशल्यासाठी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या ज्युरीने निवडलेल्या 75 तरुण सर्जनशील कलाकारांचे अभिनंदन करून मंत्र्यांनी  सांगितले  केले की,  हे चित्रपटकार , अभिनेते, गायक, पटकथा लेखक आणि इतरांना त्यांची सर्जनशीलता जगप्रसिद्ध कार्यक्रमात प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ,हा या उपक्रमामागील सरकारचा उद्देश आहे.

या 75 उदयोन्मुख कलावंतांमध्ये भारतातील अनेक लहान शहरे आणि नगरांमधून निवडण्यात आलेल्या गुणी कलावंतांचा समावेश आहे अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

 

भारतातील 23 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधून ते इफ्फीमध्ये आले आहेत. त्यामध्ये आसाम आणि मणीपूर या ईशान्येकडील राज्यांमधील पाच जणांचा आणि जम्मू आणि काश्मीरमधील एकाचा समावेश आहे. हे सर्व 75 तरुण गुणवंत भारतातील विविध राज्यांमधून निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश (2), आसाम (4), बिहार (4), छत्तीसगड (3),दिल्ली (6), गोवा (2), जम्मू आणि काश्मीर (1), गुजरात(1),हरयाणा(1),हिमाचल प्रदेश (2),झारखंड (1),कर्नाटक (1), केरळ (8), मध्य प्रदेश (4), महाराष्ट्र (14), मणीपूर (1), पंजाब (1), राजस्थान (1), तामिळनाडू (4), तेलंगण (2), उत्तर प्रदेश (3), उत्तराखंड (3) आणि पश्चिम बंगाल (6) यांचा समावेश आहे. या 75 सर्जनशील गुणवंतांना अनेक नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकारांना भेटण्याची संधी इफ्फीमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यांना चित्रपट उद्योगातील तज्ञांशी संवाद साधण्याची आणि मास्टर क्लासेसना उपस्थित राहण्याची आगळीवेगळी संधी देखील दिली जाणार आहे.

या विजेत्यांची पूर्ण यादी या ठिकाणी पाहता येईल.

नोंदणीकृत इफ्फी  प्रसारमाध्यम प्रतिनिधी किंवा इतर प्रसारमाध्यम सहकाऱ्यांना या विजेत्यांच्या मुलाखती घेण्याची इच्छा असल्यास ते या विजेत्यांच्या संपर्काच्या तपशीलाची माहिती मिळवण्यासाठी त्याबाबतची विनंती iffi-pib@nic कडे ईमेल द्वारे पाठवू शकतात

देशभरातून निवडलेल्या 75 सर्जनशील गुणवंताची सविस्तर माहिती

या स्पर्धेचे तपशील या ठिकाणी पाहता येतील.


* * *

Jaydevi PS/S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1773584) Visitor Counter : 289