पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी श्री गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
19 NOV 2021 8:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देवजींच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या विशेष प्रसंगी, श्री मोदी यांनी त्यांच्या पवित्र विचारांचे आणि उदात्त आदर्शांचे स्मरण केले आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"श्री गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या विशेष प्रसंगी, मी त्यांच्या पवित्र विचारांचे आणि उदात्त आदर्शांचे स्मरण करतो. एक न्यायी, दयाळू आणि सर्वसमावेशक समाजाची त्यांची दृष्टी आपल्याला प्रेरणा देते. श्री गुरु नानक देवजी यांनी इतरांची सेवा करण्यावर दिलेला भरही प्रेरक आहे."
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1773148)
आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam