माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीच्या कॅलिडोस्कोप पॅकेज मधल्या चित्रपटांचा रंगीबेरंगी खजिना उघड, रसिकांसाठी 11 चित्रपटांची मेजवानी
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021
52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कॅलिडोस्कोप सदरात निवडले गेलेले चित्रपट खालील प्रमाणे आहेत -
1. बॅड लक बँगिंग ऑर लुनी पॉर्न
दिग्दर्शक: राडू जेड | रोमानिया, लक्झम्बर्ग, क्रोएशिया, चेक गणराज्य | रोमानियन
कथासार: एक व्हिडिओ व्हायरल होतो. त्यात एक पुरुष आणि स्त्री मास्क घालून संभोग करताना दिसतात. त्या महिलेची ओळख पटवली जाते. विशेष म्हणजे ती एक शिक्षिका असते आणि तिने आदर्श असावे अशी अपेक्षा असते. आणि हे, त्याही पुढे जाऊन, जो समाज समाजमाध्यमांवरून आपल्याला सर्व समजते, आपणच समाजाचे उद्धारकर्ते आहोत, आपल्याला राजकारणातले सर्व समजते अशा गैरसमजात असणाऱ्या, पावित्र्याची झूल पांघरलेल्या लोकांकडून पसरविल्या जाणाऱ्या विचित्र कट सिद्धांतांना बळी पडणाऱ्या, हरवून जाणाऱ्या (समाजवादी संरचनेनंतरच्या काळात, मात्र शेवटी कुठल्याही समाजात) समाजातच ही अपेक्षा अधिक असते. प्रत्येकाला आपले मत असते. ही चर्चा नंतर, परस्पर सहमतीने स्थापित होणारे शरीर संबंध, अश्लील चित्रफिती आणि इतर गोष्टीवर निवाडा करणाऱ्या लवादात अगदी बेमालूमपणे रुपांतरीत होते.
2. ब्रिटॉन 4th
दिग्दर्शक: लेवन कोगुआश्विली | जोर्गिया, रशिया, बल्गेरिया, मोनॅको, अमेरिका | जोर्जीयन
कथासार: माजी कुस्तीवीर काखी, ज्याचे आपल्या कुटुंबाप्रती असलेले समर्पण, त्यामुळे त्याच्या टिबीलीसी येथील घरून ब्रिटॉन बीच, ब्रुकलीन येथे त्याचा मुलगा सोसोला भेटायला जाण्याच्या प्रवासाची ही कहाणी आहे. काखीचा समज असल्याप्रमाणे तो वैद्यकीय महाविद्यालयात शिकत नसतो, तर स्थानिक टोळी प्रमुखाचे जुगारात झालेले कर्ज फेडण्यासाठी सिनेमा कंपनीत काम करत असतो. काखी त्याच्या मुलाची मदत करण्याचा निर्णय घेतो....
3. कंपार्टमेंट नंबर 6
दिग्दर्शक: जुहो कुओस्मानेन | फिनलंड, जर्मनी, एस्टोनिया, रशिया | फिनिश, रशियन
कथासार: एक फिनिश तरुणी मॉस्को येथून एका गूढ प्रेम प्रकरणातून सुटका करून घेते आणि मार्मान्स्क या आर्क्टिक बंदरात जाणाऱ्या रेल्वे गाडीत बसते. हा लांबचा प्रवास एका छोट्या कंपार्टमेंटमध्ये रशियन माणसासोबत करण्यास बाध्य झाल्यानंतर, त्या कंपार्टमेंट नंबर 6 मधील प्रवासी त्यांच्या स्वतःच्या, मानवी संबंधांच्या ओढीचे सत्य समोर येते.
4.फिदर्स
दिग्दर्शक: ओमार एल झोहरी | फ्रांस, इजिप्त, नेदरलँड्स, ग्रीस | अरेबिक
कथासार: मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत एक जादूचा प्रयोग चुकतो आणि कुटुंबात अधिकार गाजवणारा पिता कोंबडा बनतो. यानंतर सर्वांवर विचित्र परिस्थिती ओढवते. त्या कुटुंबाची आई, जिचे एकसुरी आयुष्य तिचा पती आणि मुलांना समर्पित असते, ती पुढे येऊन कुटुंबाची काळजी घेण्यास बाध्य होते. आपल्या पतीला पुन्हा मिळविण्यासाठी जीवाचे रान करतांना आणि आयुष्य सुरक्षित करताना तिच्यात आमूलाग्र बदल होतात.
5. आय ॲम युवर मॅन
दिग्दर्शक: मरिया श्रेडर | जर्मनी | जर्मन
कथासार: अल्मा, बर्लिनच्या प्रसिद्ध प्रेगामॉम संग्रहालयात वैज्ञानिक म्हणून काम करते. आपल्या शोध अभ्यासक्रमासाठी निधी उभा करण्यासाठी ती विलाक्षण प्रयोगात भाग घेते. तिला तीन आठवडे एका ह्युमनॉईड रोबोसोबत राहायचे असते. हा रोबो, आपल्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे, स्वतःला तिचा आदर्श सहचर म्हणून घडवू शकतो. येथे टॉम, या तिला सुखी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्राचा देखण्या माणसाच्या रुपात प्रवेश होतो. यानंतर आभासी प्रेम, विरह आणि आपल्याला मनुष्य बनविणारे कंगोरे असलेली एक आसू आणि हसू गोष्ट सुरु होते.
6. रेड रॉकेट
दिग्दर्शक: शॉन बेकर | अमेरिका | इंग्लिश
कथासार: लेखक - दिग्दर्शक शॉन बेकर (फ्लोरिडा प्रोजेक्ट, टांगरिन) चा हा नवा बिनधास्त सिनेमा. यात अभिनेता सायमन रेक्सचा खिळवून ठेवणाऱ्या अभिनयाने परिपूर्ण, रेड रॉकेट हा रांगडा चित्रपट ज्यात अमेरिकेच्या विशिष्ट जीवनशैलीचे चित्रण आहे.
7.सौवाद
दिग्दर्शक: आयतेन अमीन | इजिप्त, टयूनिशिया, जर्मनी | अरेबिक
कथासार : सौवाद, ही एका 19 वर्षीय इजिप्तीशियन मुलीची कथा आहे, जिने आताच पौंगंडावस्थेत प्रवेश केला आहे.
आपल्या दैनंदिन आयुष्यात, तिला स्वातंत्र्याची आस असते, मात्र तिची ही आकांक्षा आणि समाज, तिचे कुटुंब आणि धार्मिक समुदाय यांची बंधने आणि तिने आत्मसात केलेल्या अपेक्षा यामुळे संघर्ष निर्माण होतो. एकीकडे तिच्या स्मार्टफोनवरुन, ती शहरातल्या मुक्त संस्कृतीशी जोडलेली असते, ऑनलाईन प्रेमप्रकरणातही गुंतली असते, तर दुसरीकडे, ती एक आज्ञाधारक विद्यार्थिनी, नम्र मुलगी आणि जबाबदार मोठी बहीण म्हणून आयुष्य जगत असते. या परस्परविरोधी दुहेरी आयुष्याचा कोलाहल तिच्या मनात सतत सुरु असतो. याच कोलाहलात तिची गाठ अशा दोन व्यक्तींशी पडते, ज्यांचा परस्परांशी काहीही संबंध नसतो, मात्र ते दोघेही सौवादशी संबंधित असतात. कदाचित या दोघांच्या सामन्यामुळेच सौवाद प्रत्यक्षात समोर येते.
आयटेन अमीन ने अत्यंत समतोलपणे या कथेत नाट्यपूर्ण वेगवान घडामोडी आणि संवेदनशील, संयतपणे व्यक्त होणाऱ्या भावना सादर करत, नायिकेची व्यक्तिरेखा उठावदारपणे, व्यक्त केली आहे. समोरच्या व्यक्तीला समजून घेत, इतरांनीही आपल्याला समजून घ्यावे अशी सौवादची इच्छा त्याने उत्कटपणे मांडली आहे .
8.स्पेन्सर
दिग्दर्शक : पाब्लो लैरेन | जर्मनी, ब्रिटन | इंग्लिश
कथासार : प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या वैवाहिक आयुष्यात फार लवकरच दुरावा आला होता. त्यामुळे त्यांचा घटस्फोट होणार, प्रिन्सेस डायनाचे अफेअर याच्या अफवा, सगळीकडेच उडत होत्या. मात्र, राणीच्या सँडरिंगहॅम इस्टेट मधल्या नाताळ कार्यक्रमात त्यांच्यात शांतता प्रस्थापित झाल्याचा आभास निर्माण केला जातो. तिथे खाणे-पिणे, शूटिंग आणि हंटिंग सगळे होते. मात्र, डायनाला या सगळ्या गोष्टींची जाणीव असते. मात्र, यावर्षी सगळ्या गोष्टी वेगळ्याच असणार आहेत.
प्रिन्सेस डायनाच्या बाबतीत झालेला दुर्देवी अपघात आणि पुढचा घटनाक्रम न होता दुसरे काहीतरी सांगणारी काल्पनिक कथा स्पेन्सरमध्ये दाखवण्यात आली आहे.
9. द स्टोरी ऑफ माय वाईफ
दिग्दर्शक : एड्डीको एनयेडी | हंगेरी, जर्मनी, इटली, फ्रांस | इंग्लिश, डच, फ्रेंच, जर्मन , इटालियन
कथासार: द स्टोरी ऑफ माय लाईफ ची कथा आहे, कॅप्टन जेकब स्टोर (गीज नाबेर) या शूर मात्र शापित अशा सैनिकाची. एका कॅफे मध्ये बसला असतांना तो सहज आपल्या सहकाऱ्यासोबत पैज लावतो की या कॅफेमध्ये येणाऱ्या पहिल्या महिलेशी तो लग्न करेल. स्टोरचे ग्रह त्याच्या अगदी विरुद्ध असतात, म्हणून की काय आत येणारी पहिली स्त्री असते, लेझी, आणि पुढे जे त्याच्या नशिबात असते, तेच होते.
10. द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड
दिग्दर्शक : जोआचिम ट्रायर | नॉर्वे, फ्रांस, स्वीडन, डेन्मार्क | नॉर्वेजियन
कथासार : ही एक आधुनिक नाट्यमय कथा असून, ऑस्लो शहरात, प्रेम आणि आयुष्याचा अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. ज्यूली या युवतीच्या आयुष्याची ही कथा आहे, ज्यात ती तिच्या प्रियकरासोबतच्या नात्यातील गुंतागुंतीच्या त्रासातून नवा मार्ग शोधते आणि आपल्या करियरचा मार्ग निवडण्यासाठी संघर्ष करते. या संघर्षाच्या प्रवसात, तिला स्वतःची खरी ओळख गवसते.
11. टीटाने
दिग्दर्शिका : ज्यूलिया दुकोऱ्नौ| फ्रांस, बेल्जियम | फ्रेंच|
कथासार : जखमी चेहऱ्याचा एक युवाक एका विमानतळावर लोकांना आढळतो. त्याच नाव- आद्रेइन लेग्रँड असल्याचा त्याचा दावा असतो- याच नावाचा एक मुलगा दहा वर्षांपूर्वी नाहीसा झाला असतो. एकीकडे त्या प्रदेशात अत्यंत भीषण अशा हत्यांची मालिकाच सुरु असते, अशा परिस्थितीत अखेर आद्रेइन आणि त्याच्या पित्याची पुनर्भेट होते.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772966)
Visitor Counter : 307