माहिती आणि प्रसारण मंत्रालय

इफ्फिच्या रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात रशियन चित्रपट निर्माते, आंद्रेई कोन्चालोव्ह्स्की आणि हंगेरीयन चित्रपट निर्माते बेला टा यांचे चित्रपट दाखवले जाणार

Posted On: 17 NOV 2021 6:20PM by PIB Mumbai

 

52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात, सुप्रसिद्ध हंगेरियन चित्रपट निर्माते, बेला टा यांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत.. त्यांच्या चित्रपटांबी बर्लिन, कान्स आणि लोकार्नो अशा नावाजलेल्या चित्रपट महोत्सवात मानसन्मान मिळवले आहेत.

बेला टा यांचची चित्रपटनिर्मितीची स्वतःची प्रभावी शैली आहे, ज्यामुळे, हा चित्रपट त्यांचाच चित्रपट बनून जातो.

याच विभागात, रशियन चित्रपट निर्माते आणि रंगभूमी दिग्दर्शक, आंद्रेई कोन्चालोव्ह्स्की यांचेही चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यांच्या चित्रपटांनाही विविध महोत्सवात गौरवण्यात आले आहे, ज्यात कानच्या ग्रां प्री विशेष ज्युरी सन्मानाचाही समावेश आहे. त्याशिवाय FIPRESCI पुरस्कार, दोन सिल्व्हर लायन्स पुरस्कार, तीन गोल्डन ईगल पुरस्कार, आणि एका प्राईमटाईम एमी पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत.

आंद्रेई  सर्गीविच कोन्चालोव्ह्स्की (जन्म :20  ऑगस्ट, 1937,मॉस्को) यांचां जन्म सुपासिध्द लेखक, सर्गेई मिखाल्कोव्ह आणि नतालिया कोन्चालोव्हास्काया यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी केंद्रीय संगीत विद्यालयात संगीताचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर VGIK संस्थेमधून दिगदर्शनाचे प्रशिक्षण घेतले. 1965 साली आकीरा कुरोसावा यांच्याकडून प्रेरणा घेत, त्यांनी आपला पहिला चित्रपट, द फर्स्ट टीचर ची निर्मिती केली. त्यांचे आणखी उल्लेखनीय चित्रपट म्हणजे, ‘द स्टोरी ऑफ अस्याक्लायचिना, हू लव्ह्ड बट डीड नॉट मैरी (1966) आणि अंकल वान्या (1970) यांना प्रेक्षकांसोबतच, समीक्षकांची देखील कौतुकाची पावती मिळाली होती.

 

कोन्चालोव्ह्स्की  यांचे पुढील चित्रपट 52 व्या इफ्फीमध्ये दाखवण्यात येणार आहेत :

1. द फर्स्ट टीचर

1965 | रशियन | रशिया

कथासार :

चिंगिज ऐतमतोव्ह यांची कादंबरी द फर्स्ट टीचरवर हा चित्रपट आधारित आहे.  यादवी युद्धानंतरच्या सोव्हियत रशियाच्या काळात, किर्गीस्तानच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा उलगडते. रशियन सैन्याचे माजी सैनिक, द्युशियन यांना कोमसोमोल कडून, एका छोट्यां गावात लहान मुलांचे शिक्षक म्हणून पाठवले जाते. मात्र शिक्षक म्हणून कां करतांना लवकरच त्यांच्या लक्षात येते की त्यांची राष्ट्रभक्ती आणि देशाला प्रगतीपथावर नेण्याची त्यांना झालेली घाईयांना स्थानिक लोकांच्या प्राचीन संस्कृतीशी स्पर्धा करावी लागणार आहे.

 

2. अंकल वान्या

1970 | रशियन| रशिया

कथासार: अंतोन चेकॉव्ह या सुप्रसिद्ध नाटककाराच्या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे. रशियाच्या एका शांत आणि काहीही न घडणाऱ्या प्रांतात घडणारी ही कथा आहे. अंकल वान्या हे चित्रपटाचे नायक या शांत भागात, अगदी थोड्या काळासाठी नशिबानेच आलेल्या एका स्त्रीच्या प्रेमात पडतात, आणि त्यामुळे त्यांच्याही मनाविरुद्ध, त्यांच्या मनात, अनेक वादळे तयार होतात, ज्यामुळे ते अखेर निराशेच्या गर्तेत सापडतात.

 

3. रनअवे ट्रेन

1985 | इंग्लिश

कथासार : अलास्काच्या पार्श्वभूमीवर  असलेल्या या चित्रपटात, मॅनी, हा एक सराईत गुन्हेगार (जॉन व्होईट) आणि तुरुंगातील त्याचा सोबती, बक (एरिक रॉबर्स्त) असतात, कितीही सुरक्षित तुरुंग, अगदी बर्फाळ प्रदेशांतील तुरुंग असेल, तरीही, त्यातून पळून जाण्यात ते यशस्वी होतात. त्यानंतर, स्वतंत्र होण्याच्या नादात, हे फरार गुन्हेगार एक धावती रेल्वेगाडी पकडतात, मात्र नशीब त्यांची साथ देत नाही. ट्रेनचा ड्रायव्हर अचानक हृद्याविकाराच्या झटक्याने मरतो आणि, अत्यंत भरधाव वेगाने थेट मृत्यूच्या दिशेने धावणाऱ्या ट्रेनमध्ये हे दोघे अडकतात...

 

4. द पोस्टमन्स व्हाईट नाईट्स

2014 | रशियन | रशिया

कथासार : केनोझोरो लेकवरील बेटावर असलेल्या लहानशा गावातल्या रहिवाशांचा इतर प्रदेशांशी संपर्कच नसतो, केवळ एका बोटीने हे दुर्गम गाव, मुख्य शहरांशी जोडलेले असते, त्यामुळे, इथले लोक आपल्या पूर्वजांप्रमाणेच प्राचीन आयुष्य जगत असतात. अत्यंत छोटा समुदाय असलेल्या या गावात, सगळेच लोक एकमेकांना ओळखत असतात. आणि आपल्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वस्तूंचेच ते उत्पादन करतात. द व्हिलेज पोस्टमन ( अलेक्सी ट्रायपेतिस्न) म्हणजे या गावात येणारा पोस्टमन हाच त्यांना बाहेरच्या जगाशी जोडणारा एकमेव दुवा असतो. जणू आपल्या मोटरबोटने तो दोन संस्कृतींना जोडत असतो. मात्र, जेव्हा त्याच्या बोटची मोटर चोरीला जाते आणि तो जिच्यावर प्रेम करत असतो, ती जेव्हा शहरात पळून जाते, त्यावेळी पोस्टमन अत्यंत निराश होऊन तिच्या मागे जातो, एक नवे साहस आणि नव्या आयुष्याच्या शोधात.....

 

5. पॅराडाईज

2016 | रशियन, जर्मन, फ्रेंच | रशिया

कथासार: पॅराडाईज

पॅराडाईज चित्रपटात तीन व्यक्तिरेखांची कथा आहे, ओल्गा, जूल्स आणि हेल्म्यूट यांची ! युद्धानंतरच्या उध्वस्त या तिघांची आयुष्ये एकमेकांच्या समोर येतात. ओल्गा, रशियातील घरंदाज कुटुंबातील मुलगी आणि फ्रेंच रेझिस्टन्सची सदस्य असून ज्यू मुलांना लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली, नाझी पोलीस तिला अटक करतात. शिक्षा म्हणून तिला तुरुंगात पाठवले जाते, तिथे तिची भेट, ज्युल्स या फ्रेंच-नाझी सहकाऱ्याशी होते, ज्यूल्सला तिच्या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी दिली जाते. जुल्सला ओल्गा आवडू लागते आणि तिची शिक्षा कमी करण्यासाठी तो तिला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर देतो. ओल्गा याला होकार देते, कठोर शिक्षा टाळण्यासाठी ती कोणतीही तडजोड करायला तयार असते. मात्र, तिची, स्वातंत्र्याची आकांक्षा लवकरच मावळते कारण पुढे अत्यंत अनपेक्षित घटनांना तिला सामोरे जावे लागते.

बेला टा यांचा जन्म 21 जुलै, 1955 रोजी हंगेरीच्या पेकस इथे झाला होता. ते बुडापेस्ट इथल्या नाट्य आणि चित्रपट अकादमीचे विद्यार्थी होते. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी नवोदित चित्रपट निर्माते म्हणून कारकीर्द सुरु केली. बलाझबेला स्टुडीओ (BalázsBélaStúdió) मध्ये काम करत असतांना त्यांनी आपला पहिला चित्रपट, ‘द फैमिली नेस्ट (1977)’ दिग्दर्शित केला. त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे, डॅमनेशन (1988), व्र्हेकमेईस्टर हार्मनिज (2000), द टुरिन हॉर्स (2011), सटनटॅङो (1994).

 

52 व्या इफ्फीमध्ये बेला टा यांचे पुढील चित्रपट दाखवले जाणार आहेत:-

1. द फैमिली नेस्ट 

1977 | हन्गेरीयन | हन्गेरी

कथासार : इरेन, बुडापेस्ट इथे आपल्या मुलीसह, तिच्या सासू-सासऱ्यांच्या छोट्याश्या घरात राहत असते. तिचा नवरा, लासी नुकताच आपल्या सैन्यातल्या नोकरीवरून परत आला असतो, आणि त्यानंतर त्या दोघांमधील वैवाहिक संबंध हळूहळू बिघडू लागतात. पुढे अशी परिस्थिती निर्माण होते की इरेनला आपले घर सोडून जायची इच्छा होते, मात्र, नवे घर घेण्याचा तिचा विनंती अर्ज साम्यवादी राजवटीत अडकून पडतो.....

 

2. आउटसायडर

1981 | हन्गेरीयन | हन्गेरी

कथासार: हंगेरीच्यां औद्योगिक वसाहतीत, आंद्रेस, हा संगीतप्रेमी युवा नर्स राहत असतो. मद्यपान केल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकलेले असते, हे त्याच्या आयुष्यातील दुसरे अपयश ! एकटाच, निरुद्देश  शहराच्या रस्त्यांवरून भटकत असतांना आंद्रेसला नवी नाती गवसतात.

 

3. डॅमनेशन

1988 | हन्गेरीयन | हन्गेरी

कथासार: एका दुर्गम प्रदेशात, केरर कित्येक वर्षे इतर जगापासून तुटून, दूर एकटाच राहत असतो. न थांबणाऱ्या अखंड पावसात वाहून जाणाऱ्या टोपल्या बघत तो तासनतास बसलेला असतो. असेच एकलकोंडे आयुष्य जगताना बाहेरच्या जगाशी संबंध येणारी एकमेव जागा म्हणजे, टायटेनिक हा पब, जिथे तो रोज रात्री आपला बॉस विल्र्स्की सोबत जातो . तिथे गाणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडून केरर तिला मिळवण्याचा प्रयत्न करतो.

 

4. द टुरिन हॉर्स

2011 | हंगेरियन, जर्मन | हंगेरी, फ्रांस

कथासार : एका मालवाहू गाडीच्या  चालकाला आपल्या घोड्याला चाबकाने मारतांना बघून, विचारवंत, फ्रेड्रिक निस्त्शे त्याला वाचवायला पुढे धावतो, तो घोड्याभोवती आपल्या बाहूंचे संरक्षण देतो, आणि त्या प्रयत्नांत एकदम कोसळतो- पुन्हा कधीच उभे न राहण्यासाठी. ही कथां आहे त्या चालकाचे, त्याच्या कुटुंबाचे आणि त्याचा तबेल्याचे काय झाले याची!

 

 

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772691) Visitor Counter : 196