उपराष्ट्रपती कार्यालय

समाजाच्या उत्थानासाठी नव्या कल्पना आणि संशोधन घेऊन या - संशोधक आणि स्वयं उद्योजकांना उपराष्ट्रपतींचे आवाहन


बेंगळूरू तंत्रज्ञान शिखर परिषद 2021 चे उप्रष्ट्रापातींच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 17 NOV 2021 12:57PM by PIB Mumbai

 

भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि स्वयं उद्योजकांना समाजाच्या उत्थानासाठी नवीन कल्पना आणि संशोधन करून मानवतेच्या विकासासाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी ज्ञान संपत्ती आणि आर्थिक संपत्ती निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

बेंगळूरू येथे बेंगळूरू तंत्रज्ञान शिखर परिषद 2021 च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नायडू म्हणले की, आपल्या आयुष्यात आनंद आणि सुख आणणे, हे तंत्रज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट असते. त्यांनी, लोकांच्या ज्वलंत समस्या सोडवून, त्यांचे आयुष्य जास्त आनंदी आणि सुखी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन केले.

बेंगळूरू तंत्रज्ञान शिखर परिषदेत सहभागी झालेल्या सर्व तंत्रज्ञाना उपराष्ट्रपतींनी कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. शेतीमध्ये छोट्या छोट्या कृषी तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, असे त्यांनी सुचवले.

जसे की अचूक कृषी, ऑनलाईन बाजारपेठा आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कृषी क्षेत्रात केला जाऊन शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यास मदत होऊ शकते. हवामान बदलाचे कृषी क्षेत्रावर होणारे विपरीत परिणाम हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत, या आव्हानांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जावा, असे ते म्हणाले.

यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांनी सुप्रसिद्ध कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनाविषयी शोक व्यक्त केला. "पुनीत राजकुमार केवळ उत्तम अभिनेतेच नव्हते, तर गरजूंना मदत करणारे, त्यांची काळजी करणारे ते एक उमदे व्यक्तिमत्वही होते" असे नायडू म्हणाले. बीटीएस-2021 मध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचे आभार मानले.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, संशोधन, उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772567) Visitor Counter : 184