संरक्षण मंत्रालय
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अवजड वस्तूसाठा अति उंचीवरील भागात पोहचवण्यासाठी भारतीय हवाई दलाची मोहीम
Posted On:
17 NOV 2021 12:28PM by PIB Mumbai
भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराने 15 नोव्हेंबर रोजी ‘ऑपरेशन हर्क्युलिस’ ही संयुक्त मोहीम राबवत अवजड सामान सैन्याच्या उंचावरील तळांवर पोहचवण्याचे कार्य केले. उत्तर भागात, तैनात असलेल्या सैन्य तुकड्यांना, हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा लॉजिस्टिक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.
हे सामान घेऊन जाण्यासाठी, C-17, IL-76 आणि An-32 या लढावू विमानांचा वापर केला. पश्चिम हवाई कमांडच्या तळापासून या विमानांनी उड्डाण केले. भारतीय हवाई दलाच्या जास्तीत जास्त अवजड सामान वाहून नेण्याच्या सर्वोच्च क्षमतेचे हे थेट प्रात्यक्षिक होते.याआधीही आपत्कालीन स्थितीत भारतीय हवाई दलाची क्षमता सिद्ध झाली आहे.
*****
Jaydevi PS/RA/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772542)
Visitor Counter : 247