पंतप्रधान कार्यालय
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली
Posted On:
15 NOV 2021 10:18AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 15 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अत्यंत आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली आहे. स्वातंत्र्य चळवळीला बळकट करण्यासाठी मुंडा यांनी दिलेले योगदान आणि आदिवासी समाजाच्या हितासाठी त्यांनी दिलेला लढा यांचे स्मरण पंतप्रधानांनी केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“भगवान बिरसा मुंडा यांना आदरपूर्वक श्रद्धांजली. स्वातंत्र्य चळवळीला आणखी बळकट करण्यासह आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांनी सदैव संघर्ष केला. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.”
*******
STupe/SChitnis/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771841)
Visitor Counter : 245
Read this release in:
Hindi
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam