माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीमधील “75 क्रिएटिव्ह माईन्ड्स ऑफ टूमारो (उद्याची 75 सर्जनशील व्यक्तिमत्वे)” निवडण्यासाठीच्या ग्रँड ज्युरी आणि सिलेक्शन ज्युरींची घोषणा
चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्गज मनोज वाजपेयी, रसूल पुकुट्टी, शंकर महादेवन यांचा ग्रँड ज्युरीमध्ये समावेश
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत तसेच देशातील युवा सर्जनशक्तीला आणि उदयोन्मुख प्रतिभेला शोधून, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीमध्ये देशातील युवा चित्रपट निर्मात्यांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत, ज्यांच्यापैकी 75 सर्जनशील सर्वोत्तम चित्रपट निर्मात्यांची निवड केली जाणार असून, त्यांना 52 व्या इफ्फीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या ‘75 क्रिएटिव्ह माईन्ड्स ऑफ टूमारो (उद्याची 75 सर्जनशील व्यक्तिमत्वांना)” गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचे विशेष आमंत्रण असेल. या महोत्सवात ते चित्रपट सृष्टीतील नामवंतांशी चर्चा करु शकतील. महोत्सवादरम्यान होणारे मास्तर क्लासेस/ इन-कन्व्हरसेशन अशी चर्चासत्रे, परिसंवाद यातही ते सहभागी होऊ शकतील. यात निवड झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रवासाचां आणि निवासाचा खर्च देखील आयोजकांकडून केला जाईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज या ‘75 क्रिएटिव्ह माईन्ड्स ऑफ टूमारो (उद्याची 75 सर्जनशील व्यक्तिमत्वे)”निवडण्यासाठीच्या ग्रँड ज्युरी आणि सिलेक्शन ज्युरींची घोषणा केली. त्यांची यादी पुढीलप्रमाणे
ग्रँड ज्युरी
- प्रसून जोशी - नामांकित गीतकार आणि अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ
- केतन मेहता - नामांकित दिग्दर्शक
- शंकर महादेवन - नामांकित भारतीय संगीतकार/गायक
- मनोज बाजपायी - नामांकित अभिनेता
- रसूल पुकुट्टी - ऑस्कर विजेता ध्वनिमुद्रक
- विपुल अमृतलाल शाह - नामांकित निर्माता/दिग्दर्शक
सिलेक्शन ज्युरी
- वाणी त्रिपाठी टिक्कू - निर्माती/अभिनेत्री, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ सदस्य.
- अनंत विजय - लेखक आणि चित्रपट समीक्षेसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते
- यतींद्र मिश्रा - प्रसिद्ध लेखक, चित्रपट समीक्षेसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते
- संजय पुरन सिंग - चित्रपट निर्माते, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते.
- सचिन खेडेकर - अभिनेते, दिग्दर्शक
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी 22 ऑक्टोबर या उपक्रमाची घोषणा केली होती. 52 व्या इफ्फीमध्ये चित्रपट सृष्टीत येण्यासाठी धडपडणाऱ्या, देशभरातील युवा आणि उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल, असे त्यांनी यावेळी म्हटले होते. त्यांना या व्यासपीठाद्वारे, सिनेमाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी दिली. या युवा निर्मात्यांची निवड एका स्पर्धेद्वारे केली जाईल.
या स्पर्धेचा उद्देश, देशातील 75 युवा चित्रपट निर्माते, अभिनेते, गायक, पटकथा लेखक आणि इतरांना चित्रपटसृष्टीच्या जागतिक व्यासपीठावर आपले कलानैपुण्य आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी हा आहे.
यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख, 1 नोव्हेंबर, 2021 ही आहे.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771223)
Visitor Counter : 281