शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजनैतिक अधिकाऱ्यांच्या परिषदेत सहभाग, शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाबाबत सरकारच्या दृष्टीकोनाची रूपरेखा केली विशद

Posted On: 12 NOV 2021 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021

केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज चंदिगड विद्यापीठाने आयोजित केलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या परिषदेत भाग घेतला.

यावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी जगाचे ज्ञानकेंद्र म्हणून  भारताचे पारंपारिक सामर्थ्य आणि कोविड पश्चात आकाराला आलेल्या नवीन जगात भारताच्या स्थानाला आकार देण्याच्या दृष्टीने शिक्षणाची भूमिका याबद्दल विचार मांडले.

केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शिक्षण पद्धती विषयी आपला दृष्टीकोन विशद केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून आकाराला आलेल्या धोरणामुळे दर्जेदार शैक्षणिक संस्था, विविध संस्कृतींचा मेळ असलेली सामाजिक वीण, संशोधन क्षेत्राला महत्व, नवोद्योजकता आणि आंतरराष्ट्रीयीकरण यामुळे भारताची शैक्षणिक पद्धती नवी उंची गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'वसुधैव कुटुम्बकम' या ब्रीदवाक्यावर भारताचा प्राचीन काळापासून विश्वास असल्याचे नमूद करत त्यांनी वैश्विक नागरिक घडवण्याचे तसेच जागतिक स्तरावरील सामायिक आव्हाने ओळखून त्यासंदर्भात लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वसहमतीने काम करण्याचे आवाहन केले.

चर्चासत्राला 120 पेक्षा अधिक देशांच्या प्रतिनिधीनी उपस्थिती नोंदवल्याबद्दल प्रधान यांनी आनंद व्यक्त केला.

 

N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771207) Visitor Counter : 135