आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मात्रांचा 110.19 कोटींचा आकडा केला पार


गेल्या 24 तासांमध्ये देशभरातल्या 53.81 लाख जणांपेक्षा जास्त लोकांना लसीची मात्रा

देशाचा रूग्ण बरे होण्याचे दर सध्या 98.26 टक्के

गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या 12,516 नवीन रूग्णांची नोंद

गेल्या 267 दिवसांमध्ये उपचार सुरू असलेल्या रूग्णांची आतापर्यंतची सर्वात कमी (1,37,416) संख्या,

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर गेल्या 49 दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी (1.18टक्के)

Posted On: 12 NOV 2021 9:42AM by PIB Mumbai

नवीदिल्ली, दि. 12 नोव्हेंबर, 2021

गेल्या 24 तासांमध्ये देशात 53,81,889 जणांना कोविड प्रतिरोधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. आता 110.79 कोटी (1,10,79,51,225) लस मात्रा  देवून नवीन टप्पा गाठला आहे. आज सकाळी 7.00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या हंगामी अहवालानुसार 1,13,18,816 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. -

 

HCWs

1st Dose

1,03,80,018

2nd Dose

93,07,096

 

FLWs

1st Dose

1,83,73,522

2nd Dose

1,61,23,036

 

Age Group 18-44 years

1st Dose

42,92,51,634

2nd Dose

16,30,73,557

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,75,00,331

2nd Dose

10,27,21,593

 

Over 60 years

1st Dose

11,12,54,170

2nd Dose

6,99,66,268

Total

1,10,79,51,225

 

गेल्या 24 तासांमध्ये 13,155 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. यामुळे आत्तापर्यंत ही महामारी आल्यापासून कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या 3,38,14,080  इतकी झाली आहे.

त्याचबरोबर देशाचा रूग्ण बरे होण्याचा दर आता 98.26 टक्के झाला आहे.

 

केंद्र सरकार आणि राज्ये सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश यांनी संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांमुळे सलग 138 दिवसांपासून नव्याने दररोज नव्याने होणारी रूग्णनोंद 50,000 पेक्षा कमी होण्याचा कल कायम टिकून आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात  12,516 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे.

देशामध्ये उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 1,37,416 आहे. ही संख्या गेल्या 267 दिवसांतली सर्वात कमी संख्या  आहे. देशातल्या आत्तापर्यंतच्या एकूण बाधित रूग्णसंख्येच्या  ती 0.40 टक्के  इतकी आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

संपूर्ण देशभरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 11,62,286 चाचण्या करण्यात आल्या. देशात आत्तापर्यंत जवळपास 62.10 कोटींहून अधिक  (62,10,67,350) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.10 टक्के आहे. हा दर गेल्या 49 दिवसांपासून सातत्याने दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.07 टक्के असल्याची नोंद झाली आहे. गेल्या 39 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांहून  कमी आहे आणि गेल्या सलग 74 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

***

 

Jaydevi PS/ SB/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1771143) Visitor Counter : 265