निती आयोग
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारताने कॉप 26 परिषदेत इलेक्ट्रिक वाहनविषयक अमृत पोर्टल सुरू केले


ई-वाहनासंबंधित सर्व माहितीसाठी एकमेव ठिकाण

Posted On: 10 NOV 2021 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2021

इंग्लंडमध्ये ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉप26 परिषदेत आज भारताने इलेक्ट्रिक वाहनांसाठी 'ई-अमृत' या वेबपोर्टलचा आरंभ केला.

ई-अमृतमुळे इलेक्ट्रिक वाहनाबाबतीत असलेले गैरसमज दूर होऊन इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी , या उद्योगातील गुंतवणुकीच्या संधी, धोरणे, अनुदाने याबाबत एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणे शक्य होईल .

हे पोर्टल म्हणजे नीती आयोगाचा युके सरकारसोबतचा ज्ञान हस्तांतरण हा सहकार्यविषयक आणि दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेल्या इंग्लंड भारत संयुक्त आराखडा 2030 चा एक भाग आहे.

सरकार इलेक्ट्रिक वाहनांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी करत असलेले प्रयत्न आणि ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे फायदे लक्षात आणून देण्याच्या प्रयत्नांना ई-अमृत मुळे हातभार लागेल.

अलीकडच्या काही दिवसात भारताने वाहतुकीमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी व देशात वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. FAME आणि PLI योजना इलेक्ट्रिक वाहनांना लवकरात लवकर वापरात आणण्यासाठी अनुकूल वातावण निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या आहेत.

हे पोर्टल अधिक परस्परसंवादी आणि वापर सुलभ करण्याच्या उद्देशाने अनेक नवनवीन वैशिष्ट्ये आणि नाविन्यपूर्ण टूल्सचा वापर करण्याचा नीती आयोगाचा मानस आहे.

वेब पोर्टल आरंभ कार्यक्रमाला इंग्लंडमधील हवामानबदल मोहिमेतील मान्यवर नायगेल टॉपिंग आणि नीती आयोगाचे सल्लागार सुधेंदू ज्योती सिन्हा यावेळी उपस्थित होते.

 

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1770787) Visitor Counter : 280