ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खरीप विपणन हंगाम  2021-22 मध्ये धान खरेदीद्वारे जवळपास 11.57 लाख शेतकऱ्यांना लाभ


शेतकर्‍यांना त्यांच्या पिकासाठी एमएसपी म्हणून 41,066.80 कोटी रुपये

14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये धान खरेदी सुरळीतपणे सुरू

Posted On: 09 NOV 2021 3:35PM by PIB Mumbai

 

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने, खरीप विपणन हंगाम 2021-22 मध्ये  8 नोव्हेंबर 2021 पर्यंत चंदीगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि बिहार या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 209.52 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त धानाची खरेदी केली आहे.

परिणामी  सुमारे 11.57 लाख शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी ) म्हणून 41,066.80 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.

खरीप विपणन हंगाम 2021-22 मध्ये यापूर्वीच्या वर्षांप्रमाणेच शेतकर्‍यांकडून एमएसपीवर धानखरेदी सुरळीतपणे चालू आहे.

***

S.Tupe/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1770282) Visitor Counter : 233