गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे केले अभिनंदन


Posted On: 08 NOV 2021 7:53PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची नाळ सामान्य माणसांशी जोडण्यासाठी खरोखर विशेष प्रयत्न केले,असे शहा यांनी म्हटले आहे.

आपल्या ट्विटर संदेशांच्या मालिकेत अमित शहा यांनी म्हटले आहे, "आणीबाणीला विरोध करण्यापासून ते विविध पदांवर काम करत देशाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या स्वर्गीय जॉर्ज फर्नांडिसजींचे जीवन म्हणजे देशाप्रति निस्वार्थ सेवेचे उदाहरण आहे. त्यांना मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे ही मोठी आनंदाची बाब आहे."

अमित शहा यांनी पुढे म्हटले आहे की, "स्वर्गीय अरुण जेटली यांनी कायदा अर्थशास्त्र आणि इतर क्षेत्रांमधील आपले ज्ञान व अनुभव यांच्या योगे देशाच्या विकासात संस्मरणीय योगदान दिले आहे. मोदी सरकारने त्यांना पद्म विभूषणने सम्मानित करत स्तुत्य पाऊल उचलले आहे.

भारताच्या विकासाप्रति त्यांची समर्पित वृत्ती आम्हाला नेहमीच प्रेरणादायी असेल.

स्वर्गीय सुषमा स्वराज यांनी आपले आयुष्य देशाची सेवा आणि जनतेच्या कल्याणासाठी वेचले, परराष्ट्र व्यवहार मंत्री या नात्याने त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सामान्य माणसांशी जोडले आणि या कार्यासाठी त्या नेहमीच आठवणीत राहतील."

केंद्रीय गृहमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की आज गुजरातसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे, गफुरभाई एम भिखिया, सरिता जोशी, सुधिर कुमार जैन, शाहबुद्दिन राठोड, डॉक्टर एच एम देसाई, याझदी नौशीरवान करंजिया, नारायण जे जोशी 'करयाल' आणि डॉक्टर गुरदीप सिंह यांना मोदी सरकारने त्यांच्या विशेष योगदानाबद्दल बद्दल पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.

***

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1770139) Visitor Counter : 201