पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमधील चकराता येथे रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह मदत मंजूर
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2021 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील चकराता येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. श्री मोदी यांनी अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून सानुग्रह मदत देखील मंजूर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"उत्तराखंडच्या चकराता येथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझ्या शोकसंवेदना. यासोबतच मी जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो ही कामना करतो: पंतप्रधान मोदी
उत्तराखंडमधील चकराता येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 सानुग्रह मदत दिली जाणार आहे.- पंतप्रधान नरेंद्र मोदी"
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1768221)
आगंतुक पटल : 276
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam