अर्थ मंत्रालय

जीएसटी तुटीची भरपाई म्हणून लागोपाठ कर्ज सुविधेअंतर्गत सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विधानसभा असलेल्या ) 44,000 कोटी रुपयांची उर्वरित रक्कम जारी केली

Posted On: 28 OCT 2021 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 ऑक्टोबर 2021

जीएसटी तुटीची भरपाई म्हणून लागोपाठ कर्ज सुविधेअंतर्गत सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विधानसभा  असलेल्या ) 44,000 कोटी रुपयांची उर्वरित रक्कम जारी केली.

जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी, अर्थ मंत्रालयाने राज्ये आणि विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांना लागोपाठ कर्ज सुविधेअंतर्गत 44,000 कोटी रुपये जारी केले आहेत. यापूर्वी  जारी केलेले 1,15,000 कोटी रुपये (15 जुलै 2021 रोजी जारी  75,000 कोटी आणि 07 ऑक्टोबर 2021 रोजी जारी  40,000 कोटी रुपये )  धरून , चालू आर्थिक वर्षात जीएसटी भरपाईसाठी लागोपाठ  कर्ज म्हणून एकूण  1,59,000 कोटी रुपये  जारी केले आहेत. आज देण्यात आलेला निधी प्रत्यक्ष अधिभार संकलनातून दर 2 महिन्यातून एकदा देण्यात येणाऱ्या नियमित जीएसटी नुकसानभरपाईच्या व्यतिरिक्त  अतिरिक्त मदत म्हणून दिला जात आहे.

आज देण्यात आलेली 44,000 कोटी रुपयांची रक्कम चालू आर्थिक वर्षात जारी केलेल्या 5.69% वार्षिक परताव्याच्या 5 वर्षांच्या रोख्यांमधून   सरकारने उचललेल्या कर्जातून देण्यात आली आहे. यामुळे केंद्र सरकारला बाजारातून कोणतेही अतिरिक्त कर्ज घ्यावे लागलेले नाही.

आज देण्यात आलेल्या आर्थिक मदतीमुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इतर अनेक गोष्टींबरोबरच  आरोग्यविषयक सुविधा सुधारण्यासाठी आणि पायाभूत सुविधाविषयक प्रकल्प हाती घेण्यासाठी त्यांच्या सार्वजनिक खर्चाचे नियोजन करण्यास मदत होईल.

State/ UTs wise amount released as “Back to Back Loan in lieu of GST Compensation Shortfall” on 28.10.2021

(Rs. in crore)

Sl. No.

Name of the State/ UTs

Amount

1.

Andhra Pradesh

905.59

2.

Assam

490.76

3.

Bihar

1885.69

4.

Chhattisgarh

1374.02

5.

Goa

234.28

6.

Gujarat 

3608.53

7.

Haryana

2045.79

8.

Himachal Pradesh 

745.95

9.

Jharkhand

687.76

10.

Karnataka

5010.90

11.

Kerala   

2418.49

12.

Madhya Pradesh

1940.20

13.

Maharashtra

3814.00

14.

Meghalaya

39.18

15.

Odisha

1779.45

16.

Punjab

3357.48

17.

Rajasthan

2011.42

18.

Tamil Nadu

2240.22

19.

Telangana

1264.78

20.

Tripura

111.34

21.

Uttar Pradesh

2252.37

22.

Uttarakhand

922.30

23.

West Bengal

1778.16

24.

UT of Delhi

1713.34

25.

UT of J&K

1064.44

26.

UT of Puducherry

303.56

 

Total

44,000.00

 M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1767232) Visitor Counter : 239