इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारतात संरचित, विकसित आणि उत्पादित केलेल्या सर्व उत्पादनांवर प्रभाव पाडणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी CERT-In ला CVE क्रमांकन प्राधिकरण (CNA) म्हणून अधिकृत परवानगी

Posted On: 27 OCT 2021 2:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्टोबर 2021


इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) त्याच्या स्थापनेपासून राष्ट्रीय सीईआरटी (CERT) म्हणून असुरक्षितता समन्वय भूमिकेला अनुसरून  CERT-In कडे नोंदवलेल्या सुरक्षेसंबंधी मुद्द्यांवर जबाबदार प्रकटीकरण आणि समन्वय साधत आहे. “मेक इन इंडिया” वरील विश्वास दृढ करण्यासाठी तसेच देशात सायबर सुरक्षा विषयक संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने CERT-In ने सीव्हीई कार्यक्रमाबरोबर भागीदारी केली आहे. या संदर्भात, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (CERT-In) सीव्हीई कार्यक्रमाने CVE क्रमांकन प्राधिकरण (CNA) म्हणून भारतात संरचित, विकसित  आणि उत्पादित केलेल्या सर्व उत्पादनांवर प्रभाव पाडणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे.

सीव्हीई  हा एक आंतरराष्ट्रीय, समुदाय-आधारित प्रयत्न आहे आणि सुरक्षा संबंधित आव्हाने दूर करण्याचे काम करतो. सुरक्षासंबंधी त्रुटी  शोधल्या जातात आणि नंतर सीव्हीई  सूचीमध्ये  प्रकाशित केल्या जातात. माहिती तंत्रज्ञान आणि सायबरसुरक्षा व्यावसायिक सुरक्षा विषयक समस्या दूर करण्यासाठी आणि  त्यांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्यासाठी सीव्हीई  नोंदींचा वापर करतात.

सीव्हीई कार्यक्रमाचे ध्येय सार्वजनिकरित्या उघड केलेली सायबरसुरक्षा संबंधी आव्हाने ओळखणे, परिभाषित करणे आणि नोंद ठेवणे हे आहे. हा एक आंतरराष्ट्रीय, समुदाय-आधारित प्रयत्न आहे आणि सुरक्षेला बाधा पोहचवणाऱ्या घटकांचा शोध घेतात. सीव्हीई प्रोग्रामसह भागीदारी केलेल्या जगभरातील संस्थांद्वारे समस्येचे मूळ शोधले जाते आणि प्रकाशित केल्या जातात. या असुरक्षिततेची माहिती देण्यासाठी सीव्हीई या नोंदी  प्रकाशित करतात.

सीएनए CNA  या असुरक्षितता ओळखून त्याची माहिती तयार करण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्था आहेत. सीव्हीई सूची सीव्हीई  क्रमांकन प्राधिकरणाने (CNAs) तयार करते.  सूचीमध्ये नमूद  प्रत्येक नोंद प्राधिकरणद्वारे ठरवली जाते.  कॅटलॉगमध्ये प्रकाशित नोंदी हितधारकांना हल्ल्यांपासून यंत्रणेचे संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या  असुरक्षित माहितीचा झपाट्याने शोध आणि आकलन  करण्यास मदत करतात. प्रत्येक सीएनएमध्ये सुरक्षेचा धोका  ओळखण्यासाठी आणि तो प्रकाशित करण्यासाठी विशिष्ट जबाबदारी आखून दिलेली असते.

CERT-Inच्या प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, CERT-In संकेतस्थळ @ https://www.cert-in.org.in/RVDCP.jsp ला भेट द्या.

 

* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1766876) Visitor Counter : 57


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu