PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 26 OCT 2021 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 26  ऑक्टोबर 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

देशात गेल्या 24 तासात  64,75,733  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत एकूण 102.94 कोटीहून अधिक  (1,02,94,01,119)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,02,28,502 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या  आहेत.

गेल्या 24 तासात 15,951 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,35,83,318 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. परिणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर आता  98.19% झाला आहे.हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर आहे.

सलग 121 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 12,428 नव्या रुग्णांची नोंद झाली. ही संख्या गेल्या 238 दिवसातली  सर्वात कमी संख्या आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  2 लाखाच्या खाली कायम असून सध्याची 1,63,816  ही उपचाराधीन रुग्ण, संख्या गेल्या 241 दिवसातली  सर्वात कमी संख्या आहे,ही संख्याएकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.48%  इतकी आहे.

देशात गेल्या 24 तासात 11,31,826 कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 60.19 कोटीहून अधिक  (60,19,01,543) चाचण्या देशभर केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.24%  असून गेले  32 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.10% असून गेले 21 दिवस 2% पेक्षा कमी आणि 57 दिवस 3% पेक्षा कमी आहे.

 इतर अपडेट्‌स:-

 

M.Chopade/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1766712) अभ्यागत कक्ष : 219