नौवहन मंत्रालय

'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत जेएनपीटीच्या वतीने ट्रक चालकांचे मोफत कोविड -19 लसीकरण

Posted On: 26 OCT 2021 3:44PM by PIB Mumbai

मुंबई,  26 ऑक्टोबर 2021

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी व गौरवशाली इतिहासाच्या स्मृति जागविण्यासाठी केंद्र सरकार 'आझादी का अमृत महोत्सवा’ हा राष्ट्रीय उपक्रम राबवित आहे.या अनुषंगाने देशाचे प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, यांनी बंदरालगत असलेल्या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा येथे 'सेव्ह लाइफ फाउंडेशन' आणि 'एनरिक लाइव्ह्स फाउंडेशन' च्या सहकार्याने कंटेनर ट्रक चालकांसाठी मोफत कोविड -19 लसीकरण मोहीमेचा शुभारंभ केला. यावेळी उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ उपस्थित होते.

मोफत कोविड -19 लसीकरण मोहिमे विषयी बोलताना श्री सेठी, म्हणाले, ट्रक चालक हे सागरी पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग आहेत. कोविड-19 साथीच्या काळात जेएनपीटीने कोविड-19 चा सामना करण्यासाठी आघाडीवर राहून अनेक उपाययोजना केल्या व देशातील पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकाला पाठिंबा देऊन एक सक्षम आयात-निर्यात व्यापार सुनिश्चित केला. या पार्श्वभूमीवर  ट्रक चालकांसाठी सुरू केलेली ही मोफत लसीकरण मोहीम एक महत्वाचा उपक्रम आहे. सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा हे आधुनिक सुविधांनी युक्त असून ट्रक चालकांसाठी समर्पित आहे. याठिकाणी ट्रक चालकांसाठी शयनगृह, कँटीन, स्वच्छतागृह, वाहनांची दुरुस्ती व देखभाल इत्यादि सुविधा उपलब्ध आहेत असे ते म्हणाले .

या वर्षाच्या सुरुवातीला आमच्या जेएनपीटी रुग्णालयाने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेद्वारे आम्ही जवळपास 20,000 हून अधिक लोकांना कोविड -19 लस दिल्या. शिवाय जेएनपीटीच्या समर्पित कोविड -19 आरोग्य केंद्राने (डीसीएचसी) शून्य कोविड रुग्ण नोंदवून एक नवीन टप्पा गाठला आहे. तसेच आम्ही कोविड -19 च्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण वैद्यकीय सामग्रीच्या हाताळणीस सर्वोच्च प्राधान्य देत आहोत असे सेठी म्हणाले.

 

Jaydevi PS/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1766608) Visitor Counter : 231