वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पियूष गोयल यांनी 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' या प्रकल्पाच्या प्रगतीचा घेतला आढावा

खाजगी क्षेत्राच्या सहभागाने एक ना-नफा तत्त्वावरील संस्था स्थापन करणार

Posted On: 26 OCT 2021 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  26 ऑक्टोबर 2021

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार मंत्री, पीयूष गोयल यांनी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ओएनडीसी ) उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला.या बैठकीला उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव अनुराग जैन आणि ओएनडीसी च्या सल्लागार समितीचे सदस्य असलेले राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरएस शर्मा, अध्यक्ष, क्यूसीआयचे अध्यक्ष

आदिल झैनुलभाई, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे  व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे, एनएसडीएल-ई प्रशासनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सेठी, भारतीय किरकोळ व्यापारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन, मायगव्हचे संस्थापक अरविंद गुप्ता आणि अवाना कॅपिटलच्या श्रीमती अंजली बन्सल उपस्थित होते.

या प्रकल्पात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीची माहिती मंत्र्यांना देण्यात आली.  प्रकल्पाच्या मिशन मोडमध्ये अंमलबजावणीसाठी भारतीय गुणवत्ता परिषदेने  तज्ञांचे एक पथक स्थापन केले  आहे.अनेक लहान आणि मध्यम उद्योगांना ओएनडीसी पथकाला  पूरक असणारे  स्वयंसेवक म्हणून तैनात केले आहे.एक ओएनडीसी गेटवे देखील स्थापन करण्यात आला आहे.नेटवर्कचे सर्व घटक समाविष्ट करणाऱ्या सुमारे 20 एकक   तैनातीच्या  विविध टप्प्यांवर आहेत. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने  प्रकल्पाच्या सुरुवातीच्या कामासाठी अंदाजे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील ना-नफा तत्त्वावरील  कंपनी स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे.विश्वास निर्माण करण्यासह कठोर प्रशासकीय नियम, जबाबदारी आणि पारदर्शकता प्रदान करताना, नैतिक आणि जबाबदार वर्तनावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने मालकांना  जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे  प्रोत्साहन न देणारी अशी ना-नफा तत्त्वावरील कंपनी संरचना असेल.

सक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून नेटवर्क विकसित करणे आणि कार्यक्षेत्रातील घटकांना  मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने सहभागासाठी  प्रोत्साहन देणे ही या कंपनीची भूमिका असेल.

ही कंपनी  नेटवर्कसाठी डिजिटल पायाभूत सुविधा, सामायिक नोंदणी, सहभागींचे प्रमाणीकरण आणि प्रमाणित संस्था, तक्रार निवारण इत्यादी गोष्टींच्या नेटवर्कचे व्यवस्थापन करण्यासाठी मूलभूत सेवा देखील प्रदान करेल. बाजारातील सक्रियतेसाठी  आणि भागीदार कंपन्यांसह चोख नेटवर्क निर्माण करण्यासाठी ही कंपनी खरेदीदार, विक्रेते आणि गेटवेसाठी संदर्भ अप्लीकेशन विकसित आणि कार्यान्वित  करेल. सध्याच्या सॉफ्टवेअर अप्लीकेशनना नेटवर्कशी त्वरीत जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी तयार साधने विकसित करून लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांच्या डिजिटल परिवर्तनामध्ये पाठबळ देईल. प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल श्री गोयल यांनी समाधान व्यक्त केले आणि हे नेटवर्क लवकरच प्रत्यक्षात आणण्यासाठी कालमर्यादा कमी  करण्याची इच्छा व्यक्त केली.

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1766615) Visitor Counter : 136