ग्रामीण विकास मंत्रालय

अमृत महोत्सवाचा भाग म्हणून 152 सक्षम केंद्रे (आर्थिक साक्षरता आणि सेवा वितरण केंद्र) आठवडाभरात झाली सुरू

Posted On: 22 OCT 2021 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  22 ऑक्टोबर 2021

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या  दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान  (डीएवाय  -एन आरएलएम ) अंतर्गत4-8 ऑक्टोबर, 2021 दरम्यान  देशातील 13 राज्यांमधील 77 जिल्ह्यांमध्ये एकूण 152 आर्थिक साक्षरता आणि सेवा वितरण केंद्र (सक्षम  केंद्र) सुरू करण्यात आली.

आर्थिक साक्षरता आणि सेवा वितरण केंद्र (सीएफएल आणि एसडी) ही ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गट (एसएचजी) कुटुंबांच्या मूलभूत आर्थिक गरजा भागवविण्याच्या दृष्टीने  एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध सेवा  /एक खिडकी यंत्रणा म्हणून काम करेल.स्वयंसहाय्यता  गट आणि ग्रामीण भागातील गरीबांना आर्थिक साक्षरता प्रदान करणे आणि आर्थिक सेवा (बचत, पत, विमा, निवृत्तीवेतन  इ.) प्रदान करणे, हे केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) यांच्या मदतीने, एसएचजी नेटवर्कद्वारे, मुख्यत्वे क्लस्टर स्तरीय संघाच्या  (सीएलएफ)  पातळीवर या केंद्रांचे व्यवस्थापन केले जाईल.

ब्रजसुंदरपूर गाव, रणपूर ब्लॉक, नयागढ जिल्हा , ओदिशा

या प्रशिक्षित सीआरपींना म्हणजेच समुदाय संसाधन व्यक्तींना  जिल्ह्याच्या अग्रणी  बँकेने स्थापन केलेल्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांमध्ये (आरएसईटीआय) सहा दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाते.या सर्व संसाधन व्यक्तींना  आर्थिक साक्षरता समुदाय संसाधन व्यक्ती  (एफएल सीआरपी) म्हणून ओळखले जाते, त्यांना  स्थानिक भाषांमध्ये प्रशिक्षण साधन संच देखील प्रदान केला जातो.

गोविंदपूर गाव, गुईजन ब्लॉक, तिनसुकिया जिल्हा, आसाम

ग्राम  विकास मंत्रालयाने  "SAKSHAM" नावाचे   एक मोबाइल आणि वेब-आधारित  अप्लीकेशन विकसित केले आहे.  केंद्राच्या समुदाय संसाधन व्यक्तीद्वारे ,प्रत्येक बचत गट आणि गावासाठी विविध आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी , मुख्य कमतरता जाणून घेण्यासाठी  आणि त्यानुसार प्रशिक्षण देण्यासाठी  आणि आवश्यक वित्तीय  सेवा वितरीत करण्यासाठी केला जाईल, यासाठी अप्लीकेशनचा उपयोग केला जाईल.

सिरसोड गाव, करेरा ब्लॉक, शिवपुरी जिल्हा, मध्य प्रदेश

महाराष्ट्रासह 13 राज्यांच्या   ग्रामीण आजीविका अभियानानी  (एसआरएलएम)  महिला बचत गट सदस्यांसाठी ब्लॉक आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित केले आहेत.वरील राज्यांमधील या  केंद्रांच्या अनुभवांच्या आधारेइतर राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान  राबवण्याचा निर्णय घेतला जाईल.

गांधारिया गाव, चतरा सदर ब्लॉक, छतरा जिल्हा, झारखंड

 

 Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765736) Visitor Counter : 342