आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशव्यापी लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यंत 100 कोटी 59 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासांत 61 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.16%आहे; मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर

गेल्या 24 तासांत 15,786 नवीन रुग्णांची नोंद झाली

भारताची सक्रिय रुग्णसंख्या (1,75,745) गेल्या 232 दिवसांतील सर्वांत कमी

साप्ताहिक पाॅझिटीव्हिटी दर (1.31%) गेल्या 119 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

Posted On: 22 OCT 2021 10:04AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासात 61,27,277 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 100 कोटी मात्रांचा टप्पा पार करत एकूण 100 कोटी 59 लाख लसींच्या मात्रा (1,00,59,04,580) दिल्या आहेत. 99,59,884 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

 

HCWs

1st Dose

1,03,77,821

2nd Dose

91,18,567

 

FLWs

1st Dose

1,83,68,689

2nd Dose

1,56,36,899

 

Age Group 18-44 years

1st Dose

40,22,21,442

2nd Dose

11,99,53,006

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,06,81,028

2nd Dose

8,90,38,061

 

Over 60 years

1st Dose

10,74,03,593

2nd Dose

6,27,71,243

Total

1,00,59,04,580

 

 

 

गेल्या 24 तासांमध्ये 18,641 रूग्ण कोविडमुक्त झाल्याने, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या प्रारंभापासून) 3,35,14,449 इतकी झाली आहे.

परिणामी, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.16% आहे. हा दर सध्या मार्च 2020 पासूनच सर्वाधिक दरआहे.

 


केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून सातत्यपूर्ण आणि सहयोगी प्रयत्नांमुळे सलग 116 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद होण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 15,786 नवीन रूग्णांची नोंद झाली .

 


सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 2 लाखांच्या खाली आहे आणि ती 1,75,745 असून गेल्या 232 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. सक्रीय रुग्ण दर सध्या देशातील एकूण रुग्णांच्या 0.51% आहे, जो मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

 

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत सतत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 13,24,263 चाचण्या केल्या गेल्या.  भारताने आतापर्यंत एकूण 59.70 कोटी (59,70,66,481) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढत असताना, साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी दर 1.31% वर असून गेल्या 119 दिवसांपासून 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर 1.19% इतका नोंदवला  गेला आहे.  दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर गेल्या 53 दिवसांपासून 3% च्या खाली आणि आता सलग 136 दिवस 5% च्या खाली राहिला आहे.

 



***

 

STupe/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1765693) Visitor Counter : 255