सांस्कृतिक मंत्रालय
भारताने 100 कोटी लसीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणद्वारे 100 स्मारकांवर तिरंगी रोषणाई
Posted On:
21 OCT 2021 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2021
ठळक मुद्दे
- स्मारकाची रोषणाई कोरोना योद्ध्यांप्रति - लस देणारे , स्वच्छता कर्मचारी, निमवैद्यकीय , सहाय्यक कर्मचारी , पोलिस कर्मचारी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे
- तिरंगी रोषणाईने उजळलेल्या 100 स्मारकांमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचाही समावेश
भारताने 100 कोटी लसीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल संस्कृती मंत्रालयाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण देशभरात 100 स्मारके तिरंगी रोषणाईने झळाळून टाकत आहे. कोविड महामारीविरूद्धच्या लढाईत अथक योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांबद्दल आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून रोषणाई केली जात आहे.
Humayun’s Tomb
तिरंगी रोषणाईने न्हाऊन निघालेल्या 100 स्मारकांमध्ये युनेस्कोच्या पुढील जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे - दिल्लीतील लाल किल्ला, हुमायूनचा मकबरा आणि कुतुबमिनार, उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ला आणि फतेहपूर सीकरी, ओडिशामधील कोणार्क मंदिर, तामिळनाडूतील ममल्लापुरम रथ मंदिरे, गोव्यातील सेंट फ्रान्सिस असीसी चर्च, खजुराहो, राजस्थानमधील चित्तोड आणि कुंभलगडचे किल्ले, बिहारमधील प्राचीन नालंदा विद्यापीठाचे खोदलेले अवशेष आणि गुजरातमधील धोलाविरा (अलीकडेच जागतिक वारसा दर्जा प्राप्त ).
Sun Temple, Konark
Red Fort
भारताने 100 कोटी लसीकरण टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी देशाला महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यास मदत करण्यासाठी अहोरात्र काम केले आणि मानवजातीसाठी निःस्वार्थ भावनेने सेवा केली अशा कोरोना योद्ध्यांबद्दल - लसीकरण करणारे, स्वच्छता कर्मचारी, निमवैद्यकीय , सहाय्यक कर्मचारी , पोलीस कर्मचारी आदींबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 100 स्मारके 21 ऑक्टोबर 2021 च्या रात्री तिरंगी रोषणाईने उजळून निघणार आहेत.
Khajuraho
लसीकरणाने विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यात आणि तिसरी लाट थोपवण्यात महत्वाची भूमिका बजावली असून 100 कोटी कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देऊन अब्जावधी मात्रा देणाऱ्या देशांमध्ये चीनसह भारत हा एकमेव देश आहे .
रोषणाईसाठी निवडलेल्या 100 स्मारकांची यादी पाहण्यासाठी कृपया क्लिक करा
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765539)
Visitor Counter : 219