PIB Backgrounder
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2021 7:27PM by PIB Mumbai

- 99.12 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 14,623 new cases in the last 24 hours
- Recovery Rate currently at 98.15%; Highest since March 2020
- 19,446 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,34,78,247
- Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.52%; Lowest since March 2020
- India's Active caseload stands at 1,78,098; lowest in 229 days
- Weekly Positivity Rate (1.34%) less than 3% for last 117 days
- Daily positivity rate (1.10%) less than 3% for last 51 days
- 59.44 cr Total Tests conducted so far
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


नवी दिल्ली/मुंबई, 20 ऑक्टोबर 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासात 41,36,142 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 99.12 (99,12,8 2,283) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 97,99,506 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 19,446 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,34,78,247 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.15% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.
केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 115 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे. गेल्या 24 तासात देशभरात 14,623 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी झाली असून सध्या ती 1,78,098 असून, गेल्या 229 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे.देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.52 % आहे.
देशभरात कोविड 19 चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 13,23,702 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 59.44 (59,44,29,890) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.34% असून गेल्या 117 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.10% असून गेले सलग 50 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 134 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेट्स :
महत्त्वाचे ट्विट्स
* * *
M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1765237)
आगंतुक पटल : 202