आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 99.12कोटी मात्रां टप्पा केला पार


रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.15%, मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर

गेल्या 24 तासात 14,623 नव्या रुग्णांची नोंद.

उपचाराधीन रुग्णांची संख्या (1,78,098) गेल्या 229 दिवसांपासून सर्वात कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.34%) गेल्या 117 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

Posted On: 20 OCT 2021 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्टोबर 2021

 

गेल्या 24 तासात 41,36,142 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 99.12 (99,12,8 2,283) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 97,99,506 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

HCWs

1st Dose

1,03,76,101

2nd Dose

90,98,715

 

FLWs

1st Dose

1,83,62,683

2nd Dose

1,55,81,720

 

Age Group 18-44 years

1st Dose

39,73,05,720

2nd Dose

11,57,29,771

 

Age Group 45-59 years

1st Dose

16,88,22,731

2nd Dose

8,76,73,217

 

Over 60 years

1st Dose

10,62,77,396

2nd Dose

6,20,54,229

Total

99,12,82,283

गेल्या 24 तासांत 19,446 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,34,78,247 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.15% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 115 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे. गेल्या 24 तासात देशभरात 14,623 नव्या रुग्णांची नोंद झाली. 

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी झाली असून सध्या ती 1,78,098 असून, गेल्या 229 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे.देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.52 % आहे.

देशभरात कोविड 19 चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 13,23,702 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 59.44 (59,44,29,890) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.34% असून गेल्या 117 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.10% असून गेले सलग 50 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 134 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765138) Visitor Counter : 216