सांस्कृतिक मंत्रालय

कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने आयोजित अभिधम्म दिन कार्यक्रमाला कुशीनगर येथे उद्या पंतप्रधान उपस्थित राहणार


श्रीलंका, थायलंड, म्यानमार, दक्षिण कोरिया, नेपाळ, भूतान, कंबोडिया इथले सम्मानीय भिक्खू आणि विविध देशांचे राजदूत या कार्यक्रमात भाग घेणार

वास्कादुवा श्री सुबुद्धी राजविहार मंदिर, श्रीलंका येथून आणलेल्या पवित्र बुद्ध अवशेषांचे प्रदर्शन देखील होणार

Posted On: 19 OCT 2021 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 ऑक्टोबर 2021

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाने, उत्तर प्रदेश सरकारच्या संयुक्त विद्यमाने अश्विन पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 20 ऑक्टोबर 2021 रोजी कुशीनगर, उत्तर प्रदेश येथे अभिधम्म दिनाचे आयोजन केले आहे. श्रीलंका, थायलंड, म्यानमार, दक्षिण कोरिया, नेपाळ, भूतान, कंबोडिया इथले सम्मानीय भिक्खू आणि विविध देशांच्या राजदूतांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाची शोभा वाढवतील. हा दिवस बौद्ध भिक्खूंसाठी तीन महिन्यांनंतर परतीच्या पावसाळी कालाचे -वर्षावास किंवा वासाच्या समाप्तीचे प्रतीक आहे, त्या दरम्यान ते विहार आणि मठात एकाच ठिकाणी थांबतात आणि प्रार्थना करतात. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे आणि सांस्कृतिक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, पर्यटन मंत्रालय यांचे राज्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

वासकादुवा मंदिराच्या सध्याच्या महानायकांच्या नेतृत्वाखाली पवित्र अवशेष घेऊन येणाऱ्या 12 सदस्यीय सहकाऱ्यांसह 123 प्रतिनिधींचा समावेश असलेले श्रीलंकेचे शिष्टमंडळ पवित्र अवशेषांसह कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. शिष्टमंडळात श्रीलंकेतील बौद्ध धर्माच्या चारही निकतांच्या (अधिकारी), अनुनायक (उपप्रमुख) अर्थात असगिरीया, अमरापुरा, रमन्या, मालवट्टा तसेच कॅबिनेट मंत्री, नमल राजापक्षे यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका सरकारच्या 5 मंत्र्यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वासकादुवा श्री सुबुद्धी राजविहार मंदिर, श्रीलंका येथून मंदिराच्या महानायकाद्वारे आणल्या जात असलेल्या पवित्र बुद्ध अवशेषाचे प्रदर्शन. 1898 मध्ये, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणातील पुरातत्वशास्त्रज्ञांनी सिद्धार्थनगर जिल्हा, पिप्राहवा येथील ब्रिटिश जमीनदार, विल्यम क्लॅक्सटन पेपे यांच्या जमिनीतून एका मोठ्या बौद्धकालीन वास्तू अवशेषांचे उत्खनन केले. ते कुशीनगरपासून 160 किमी अंतरावर आहे. त्यांना एक मोठी दगडी पेटी सापडली आणि या दगडी पेटीच्या आत काही पेट्या होत्या आणि एका पेटीवर हे शब्द कोरलेले होते: ‘अय्यंग्सलेलीनिधानेबुधसभागवथेसकीयनानसुकिथिबाहथानानसभागिनीकथानससुनादलथा’.

उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर हे प्राचीन शहर गौतम बुद्धांचे अंतिम निवासस्थान आहे, जिथे त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर महापरिनिर्वाण प्राप्त केले. प्राचीन काळापासून बौद्धांसाठी हे सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्याच दिवशी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. जगभरातील बौद्ध तीर्थस्थळे- पवित्र स्थळे जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे.

पंतप्रधान, श्रीलंका आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर देशांतील भिक्खूंना चिवरदानही करतील.  चिवर म्हणजे "साधूचे वस्त्र".  तीन महिन्यांनंतर परतीच्या पावसाळी काळात-वर्षावास किंवा वासाच्या समाप्तीनंतर , त्या दरम्यान ते विहार आणि मठात एकाच ठिकाणी थांबतात आणि प्रार्थना करतात, भिक्खू आणि साध्वी, संघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. तीच ही वेळ आहे.

अजिंठा भित्तीचित्रे, बौद्ध सूत्र सुलेखन-कॅलिग्राफी, वडनगर आणि गुजरातमधील इतर ठिकाणी उत्खनन केलेल्या बौद्ध कलाकृतींची चित्रेही प्रदर्शित केली जाणार आहेत. औरंगाबादचे दिवंगत श्री एम.आर. पिंपरे यांनी 40 वर्षांच्या कालावधीत काढलेली अजिंठा लेणीच्या भित्तीचित्रेही पंतप्रधान पाहणार आहेत. प्रदर्शनात जागतिक कीर्तीचे सुलेखनकार सिक्कीमचे श्री. जामयांगडोर्जी यांच्या बौद्ध सूत्रावर आधारित सुलेखनाचाही समावेश आहे.

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1764980) Visitor Counter : 307