राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
18 OCT 2021 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2021
मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणतात:-
“ईद-ए-मिलाद किंवा मिलाद-उन-नबी म्हणून साजऱ्या होणाऱ्या मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म दिवसाच्या पवित्र प्रसंगी, मी आपल्या देशातील सर्व नागरिकांना विशेषतः आपल्या मुस्लिम बंधू भगिनींना शुभेच्छा देतो.
प्रेषित मोहम्मद यांचे जीवन म्हणजे बंधुत्व, दयाभाव आणि स्नेहपूर्ण वागणुकीचा आदर्श आहे. संपूर्ण मानवजातीसाठी त्यांचे आयुष्य नेहमीच प्रेरणास्त्रोत बनून कायम राहील.
त्यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श यांपासून आपण प्रेरणा घेऊया आणि समाजाच्या समृद्धीसाठी तसेच देशभरात अधिक शांतता आणि सुसंवाद नांदण्यासाठी कार्य करूया.”
राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश हिंदी भाषेतून वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1764748)
आगंतुक पटल : 263