उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 18 OCT 2021 3:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑक्टोबर 2021

 

उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांचा संपूर्ण संदेश खाली दिला आहे -

“मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजऱ्या होणाऱ्या मिलाद-उन-नबीच्या पवित्र प्रसंगी मी आपल्या सर्व नागरिकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो.

पवित्र प्रेषितांनी आपल्याला मानवता, दयाभाव, सहनशीलता आणि जागतिक बंधुत्वाचा प्रामाणिक मार्ग दाखविला.

न्यायी, मानवतावादी आणि सुसंवादी समाज उभारणीसाठी त्यांचा स्वर्गीय संदेश आपल्याला मार्गदर्शन करीत राहो हीच सदिच्छा.”  

उपराष्ट्रपतींच्या इंग्रजी, हिंदी आणि उर्दु भाषेतील संपूर्ण संदेशासाठी येथे क्लिक करा

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1764672) आगंतुक पटल : 317
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam