आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
16 OCT 2021 11:08AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 97.23 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत
गेल्या 24 तासांत 15,981 नवीन रुग्णांची नोंद झाली, गेल्या 8 दिवसांपासून 20,000 पेक्षा कमी रुग्ण आढळून आले
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.08%; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
गेल्या 24 तासात 17,861 रुग्ण बरे झाले; एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,33,99,961
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.59% आहे, मार्च 2020 पासून सर्वात कमी
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,01,632 आहे; 218 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.44% ) गेले 113 दिवस 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.73%) गेले 47 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 58.98 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
S.Tupe/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764304)
Visitor Counter : 232