महिला आणि बालविकास मंत्रालय

जागतिक उपासमार अहवाल 2021 वर महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे स्पष्टीकरण

Posted On: 15 OCT 2021 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑक्टोबर 2021

 

कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्ट हंगर हिल्फ या प्रकाशन संस्थांनी 14 ऑक्टोबर, 2021 रोजी प्रकाशन केलेल्या ग्लोबल हंगर रिपोर्ट अर्थात जागतिक उपासमार अहवाल 2021 वर महिला आणि बाल विकास मंत्रालयाची निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

“ग्लोबल हंगर रिपोर्ट 20201 ने कुपोषित लोकसंख्येच्या प्रमाणात खाद्यान्न आणि कृषी संस्था एफएओच्या अंदाजाच्या आधारावर भारताची श्रेणी कमी केली आहे हे धक्कादायक आहे, जे वस्तुस्थिती आणि तथ्यांना अनुसरून नसून गंभीर पद्धतशीर समस्याग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्ट हंगर हिल्फे या प्रकाशन संस्थांनी जागतिक उपासमार अहवाल प्रकाशित करण्यापूर्वी योग्य शहानिशा केली नसल्याचे दिसते. 

एफएओने वापरलेली पद्धत अवैज्ञानिक आहे. गॅलपने दूरध्वनीद्वारे आयोजित केलेल्या 'चार प्रश्न' जनमत सर्वेक्षणांच्या निकालांवर त्यांनी त्यांचे मूल्यांकन केले आहे. या कालावधीत दरडोई अन्नधान्याची उपलब्धता यासारखे कुपोषण मोजण्यासाठी कोणतीही शास्त्रीय पद्धत वापरलेली नाही. कुपोषणाच्या शास्त्रीय मोजमापासाठी वजन आणि उंचीचे मोजमाप आवश्यक असते, तर येथे समाविष्ट केलेली पद्धत लोकसंख्येच्या केवळ दूरध्वनीवरील अंदाजावर म्हणजे गॅलप पोलवर आधारित आहे. कोविड कालावधीत संपूर्ण लोकसंख्येची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या मोठ्या प्रयत्नांचा वाटा या अहवालात पूर्णपणे दुर्लक्षित झाला आह, ज्यावर सत्यापित डेटा उपलब्ध आहे. जनमत सर्वेक्षणात उत्तर देणाऱ्याला सरकारकडून किंवा इतर स्रोतांकडून कोणते अन्न सहाय्य मिळाले की नाही यावर एकही प्रश्न नव्हता. या जनमत सर्वेक्षणातील प्रतिनिधीत्व सुद्धा भारत आणि इतर देशांसाठी संशयास्पद आहे.

‘जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण स्थिती  2021’ या एफएओच्या अहवालाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे की, या क्षेत्रातील इतर चार देश- अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका, कोविड 19 महामारीमुळे नोकरी/व्यवसायाचे नुकसान आणि उत्पन्नाच्या पातळीत घट आदि कारणांनी अजिबात प्रभावित झाले नाहीत उलट ते 2017 ते 19 कालावधीच्या तुलनेत 2018 ते 2020 कालावधीत अनुक्रमे 4.3%, 3.3%, 1.3% आणि 0.8% गुणांनी 'कुपोषित लोकसंख्या निर्देशांकात' त्यांची स्थिती सुधारण्यात यशस्वी झाले आहेत.

ग्लोबल हंगर रिपोर्ट 2021 आणि  'जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण 2021’ यावरील FAO च्या अहवालात सार्वजनिक तथ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या, तसेच पूर्णपणे दुर्लक्ष केलेल्‍या तथ्यांच्‍या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1764228) Visitor Counter : 439