ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विजेची हानी कमी करण्याच्या दृष्टीने उर्जा लेखांकन करण्याचे ऊर्जा मंत्रालयाचा वीज वितरण कंपन्यांना (डिस्कॉम्स) आदेश

Posted On: 11 OCT 2021 4:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्टोबर 2021

 

सध्या सुरु असलेल्या ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांच्या अंतर्गत एक महत्त्वाचे पाऊल म्हणून,नियमानुसार उर्जा लेखांकन करण्याचे आदेश ऊर्जा मंत्रालयाने आज वीज वितरण कंपन्यांना दिले. ऊर्जा संवर्धन (ईसी )अधिनियम, 2001 च्या तरतुदींअंतर्गत ऊर्जा मंत्रालयाच्या मान्यतेने ऊर्जा कार्यक्षमता विभागाने  (बीईई) यासंबंधीचे नियम जारी केले आहेत .वीज वितरण कंपन्यांद्वारे प्रमाणित ऊर्जा व्यवस्थापकाच्या माध्यमातून, 60 दिवसांच्या आत तिमाही वीज लेखांकनाची अट  यासंदर्भातील अधिसूचनेत आहे. स्वतंत्र मान्यताप्राप्त वीज लेखा परीक्षकाद्वारे वार्षिक ऊर्जा लेखापरीक्षण देखील केले जाईल.हे दोन्ही अहवाल सार्वजनिक केले जातील. हा ऊर्जा लेखा अहवाल ग्राहकांच्या विविध श्रेणींद्वारे होणारा वीज वापर आणि विविध क्षेत्रातील पारेषण  आणि वितरण हानी यासंदर्भात तपशीलवार माहिती देईल. मोठी हानी होणारे तसेच वीज चोरीचे क्षेत्र ओळखून  सुधारात्मक कारवाई करण्यासाठी हा अहवाल सहाय्य्यकारी ठरेल. विज वितरण आणि पारेषण यातील  हानी कमी करण्याच्या दृष्टीने  योग्य उपाययोजना करण्यासाठी अहवालातल्या  माहितीचा उपयोग  वीज वितरण कंपन्यांना होईल.

वीज वितरण कंपन्यांना, योग्य पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण तसेच मागणीनुसार व्यवस्थापन  (डीएसएम) यासाठीच्या करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे  प्रभावी पद्धतीने नियोजन करता येईल. हा उपक्रम आपल्या पॅरिस कराराची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारताच्या हवामानासंदर्भातील कार्यामध्ये  आणखी योगदान देईल.

वीज वितरण क्षेत्रातील अकार्यक्षमता आणि हानी  कमी करण्याच्या एकूण उद्दिष्टासह डिस्कॉम्सची  आर्थिक व्यवहार्यतेकडे वाटचाल व्हावी यादृष्टीने हे नियम ऊर्जा संरक्षण कायदा, 2001 च्या कक्षेत जारी करण्यात आले आहेत.उर्जा लेखा आणि लेखापरीक्षण अहवाल तयार करण्यात निपुण असणाऱ्या, तोटा कमी करण्यासाठी आणि इतर तांत्रिक उपायांसाठी योग्यरित्या शिफारसी करणाऱ्या  राष्ट्रीय मान्यताप्राप्त ऊर्जा लेखापरीक्षक आणि ऊर्जा व्यवस्थापकांचा  गट ऊर्जा कार्यक्षमता विभागाने प्रमाणित केला आहे. 

वीज वितरणजाळ्याच्या  परिघामधील व्होल्टेज पातळीवरील सर्व वीज प्रवाहांचा लेखाजोखा या ऊर्जा लेखांकनामध्ये निर्धारित असून यात अक्षय्य ऊर्जा निर्मिती आणि ग्राहकांसाठी खुला प्रवेश यासह ग्राहकांद्वारे ऊर्जेचा केलेल्या  वापराचे मोजमाप  याचा यात समावेश आहे. वार्षिक ऊर्जा लेखापरीक्षण आणि त्रैमासिक ऊर्जा लेखांकन आवश्यक पूर्व-अटी आणि अहवालाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, आज जारी करण्यात आलेले नियम वीज वितरण कंपन्यांसाठी बहुप्रतिक्षित व्यापक आराखडा प्रदान करतात.

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1762969) Visitor Counter : 604