आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 09 OCT 2021 9:08AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 93.99 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत

गेल्या 24 तासांत 19,740 नवीन रुग्णांची नोंद झाली.

एकूण रुग्णसंख्येपैकी उपचाराधीन रुग्णांची संख्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.70% असून; मार्च 2020 नंतर हे सर्वात कमी आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,36,643 आहे; 206 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 97.98%; मार्च 2020 पासून सर्वाधिक

गेल्या 24 तासात 23,070 रुग्ण बरे झाले; एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,32,48,291

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.62%) गेल्या 106 दिवसात 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.56%) गेल्या 40 दिवसात 3% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 58.13 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762355) Visitor Counter : 172