पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान महामहिम फुमिओ किशिदा यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली
Posted On:
08 OCT 2021 7:08PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान, महामहिम फ़ुमिओ किशिदा यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली.
महामहिम फ़ुमिओ किशिदा यांनी जपानच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
भारत आणि जपान यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीमध्ये होत असलेल्या वेगवान प्रगतीबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आणि उच्च-तंत्रज्ञान तसेच उज्ज्वल भविष्य असलेल्या विभागांसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याला वाव आहे यावर त्यांचे एकमत झाले. मोठ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक सुधारणांचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधानांनी जपानमधील कंपन्यांना आमंत्रित केले.
दोन्ही नेत्यांनी हिंद-प्रशांत प्रदेशामध्ये भारत आणि जपान यांच्यात असलेले दृष्टीकोनविषयक वाढते एकीकरण आणि दृढ सहकार्य संबंध याबाबत देखील चर्चा केली. या संदर्भात, क्वाड चौकटीअंतर्गत होत असलेल्या सहकार्य विषयक प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.
द्विपक्षीय शिखर बैठकीसाठी लवकरात लवकर शक्य होईल तेव्हा महामहीम किशिदा यांनी भारतभेटीवर यावे असे आमंत्रण पंतप्रधान मोदी यांनी दिले.
***
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762208)
Visitor Counter : 220
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam