आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. मनसुख मांडविया यांनी मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हरित फितींचे केले वितरण

Posted On: 08 OCT 2021 5:25PM by PIB Mumbai

 

"मानसिक आरोग्य हा समग्र आरोग्याचा एक आवश्यक घटक आहे आणि त्यावरील जागरूकता त्याच्या सभोवतालचे गैरसमज दूर करण्यासाठी लांबचा पल्ला पार करेल".  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज येथे ग्रीन रिबन इनिशिएटिव्हची सुरुवात करताना हे सांगितले.  5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेल्या मानसिक आरोग्य जागरूकता सप्ताहादरम्यान घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचा एक भाग म्हणून मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिल्लीच्या हंसराज महाविद्यालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

 

 

 

10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून जगभरात पाळला जातो. याप्रसंगी, डॉ. मनसुख मांडविय यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हिरव्या फिती वाटल्या. त्यांनी हंसराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या समवयस्कांमध्ये आणि समाजात मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी जागरूकता पसरवण्याचे आवाहन केले.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हिरव्या फिती वाटप करताना ते म्हणाले, ही हिरवी फित मानसिक आरोग्याचे प्रतीक आहे. आपल्याला आपल्या समाजात मानसिक आरोग्याविषयी अधिकाधिक जागरूकता पसरवण्याची गरज आहे. प्रगतीसाठी सर्व प्रकारचे चांगले आरोग्य आणि कल्याणकारी बाबी आवश्यक आहेत असे डॉ मांडवीय यांनी अधोरेखित केले. निरोगी व्यक्तींशिवाय, निरोगी कुटुंब आणि पर्यायाने  निरोगी समाज, निरोगी राष्ट्र होणार नाही. शारीरिक किंवा मानसिक अनारोग्य, खराब उत्पादनक्षमतेस कारणीभूत ठरते त्यामुळे राष्ट्रांच्या वाढीवर आणि उत्पादकतेवर विपरित परिणाम होतो, असे ते म्हणाले.

***

S.Thakur/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762159) Visitor Counter : 215