रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

किरकोळ बाजारपेठ अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी मालवाहतुक खर्च 10 टक्क्यांपेक्षा कमी करण्यावर श्री नितीन गडकरी यांचा भर

Posted On: 08 OCT 2021 4:45PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी बाजारपेठेला अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी मालवाहतुक खर्च 10% पेक्षा कमी करण्यावर भर दिला. महिन्द्रा अँण्ड महिन्द्रा आणि आयआयएम अहमदाबाद एमपॉवर मालिकेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते म्हणाले की  राष्ट्रीय इन्फ्रा पाइपलाइन आणि गति-शक्ती कार्यक्रमांच्या घोषणेद्वारे एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासावर ते भर देत आहेत. येत्या 2 वर्षात 25,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची योजना आहे. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन कार्यक्रमांतर्गत 1 लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या 2,800 प्रकल्पांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.  भारतमाला योजनेने देशभरातील प्रमुख शहरी आणि आर्थिक केंद्रांना जोडणारे 34,800 किमी महामार्ग विकसित करण्याची योजना आखली आहे असे त्यांनी सांगितले.

इथेनॉल, एलएनजी, बायो-सीएनजी, इलेक्ट्रिक, हायड्रोजन या सारख्या अनेक नवीन पर्यायी इंधनांसह, भारतातील वाहतूक क्षेत्र अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहे असे श्री गडकरी म्हणाले.  आम्ही आत्ता जे काही धोरण आखतो आहोत आणि स्वीकारत आहोत ते पुढील 30-40 वर्षांसाठी आपला मार्ग मोकळा करत आहे. आपण नवीन तंत्रज्ञानासाठी खुले असले पाहिजे कारण अति-नियमन कधीकधी उदयोन्मुख तंत्रज्ञानाला अगदी लहान वयातच मारू शकते. नव्या तंत्रज्ञानांला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अशा तंत्रज्ञानाची आर्थिक व्यवहार्यता कायम राखणे आणि सुधारण्यासाठी व्यवस्थापन क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा वापर करू शकतो असे ते म्हणाले.  इथेनॉल आणि पेट्रोलचे मिश्रण आपण करत आहोत. अगदी फ्लेक्स इंजिनांचीही जोड देत पुढे जात आहोत, जे 100% इथेनॉल किंवा 100% दोन्ही पेट्रोलवर चालते.

पूर्वी लोक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास किंवा बदल करण्यास नाखूष होते. त्यांचे काही पुर्वग्रह होते. परंतु आज भारत इलेक्ट्रिक 2 चाकींच्या विक्रीचे विक्रम मोडत आहे आणि चार चाकी वाहनांसाठीही हीच पद्धत तसेच प्रवाह राखला जाईल असे श्री गडकरी म्हणाले.

***

M.Chopade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762142) Visitor Counter : 178