वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आसियान देशांना बिगर- शुल्क प्रकारच्या अडथळ्यांना दूर करण्याचे आवाहन केले
“त्रयस्थ संस्थांकडून एफटीएचा गैरवापर होणे टाळायला हवे, परस्परांतील सवलतीला मंजुरी द्यायला हवी” : पीयूष गोयल यांचे आसियान देशांना आवाहन
Posted On:
08 OCT 2021 4:33PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आसियान अर्थात आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेतील देशांना व्यापारातील बिगर शुल्क प्रकारच्या अडथळ्यांना दूर करण्याचे आवाहन केले. भारतीय उद्योग समूहाने आयोजित केलेल्या “भारत-आसियान व्यापार: या प्रदेशातील व्यापार मंत्र्यांच्या विशेष बैठकी”ला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांनी त्रयस्थ संस्थांकडून विशेषतः आसियान प्रदेशाच्या बाहेरील देशांकडून एफटीए अर्थात मुक्त व्यापार कराराच्या गैरवापराला आला घालण्याचे आवाहन देखील केले.
“नजीकच्या भूतकाळात आपल्याला आसियान प्रदेशातील देशांतील निर्यातीमध्ये, विशेषतः कृषी आणि वाहन क्षेत्रातील निर्यातीच्या बाबतीत अनेक निर्बंधात्मक अडथळे सोसावे लागले हे अत्यंत दुर्दैवी आहे. मला वाटते की अशा निर्बंधांमुळे भारतासह इतर देशांकडून क्रिया-प्रतिक्रिया केली जाते आणि त्यातून दोन्ही देशांदरम्यान व्यापाराचा विस्तार करण्याच्या आपल्या नेत्यांच्या दीर्घकालीन इच्छेला हानी पोहोचते,” असे गोयल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणात सांगितले.
केंद्रीय मंत्री गोयल यांनी परस्पर मुक्त व्यापार करारासंदर्भात भारतातून होणाऱ्या आयातीवर सवलती देण्याची विनंती आसियान देशांना केली जेणेकरून व्यापारातील विषमता दुरुस्त होऊन आसियान देशांना अनुकूल अशा प्रकारे होईल.
शुल्क कपातीद्वारे व्यापार वाढविण्यापेक्षा, योग्य, न्याय्य, पारदर्शक,परस्पर संवादी आणि समावेशक व्यापाराच्या महत्त्वाचा गोयल यांनी पुनरुच्चार केला.
***
M.Chopade/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762135)
Visitor Counter : 208