वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

सर्व सरकारी योजनांमध्ये कौशल्य विकासावर भर देण्याचे पियुष गोयल यांचे आवाहन


“सबका प्रयासः कलेक्टिव पार्टनरशिप” वरील वेबिनारमध्ये पियुष गोयल यांचा सहभाग

Posted On: 07 OCT 2021 6:15PM by PIB Mumbai

सर्व सरकारी योजनांमध्ये कौशल्य विकास हा गाभा असेल असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. सरकारकडून अनेक औद्योगिक, वस्रोद्योग आणि ऑटोमोबाईल पार्कमध्ये  अधिकाधिक संसाधनांचा पुरवठा केला जात असून अशा प्रकारच्या प्रत्येक पार्कमध्ये संबंधित कौशल्य विकास संस्थेचा समावेश असला पाहिजे, असे गोयल म्हणाले. ते आज सबका प्रयासः कलेक्टिव पार्टनरशिप या वेबिनारमध्ये बोलत होते. देशभरात अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात(एनईपी) देखील कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामध्ये दुहेरी पदवी कार्यक्रम, परदेशी विद्यापीठाशी संलग्नता, विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम आणि शिक्षणाव्यतिरिक्त स्वतंत्र कलांना प्रोत्साहन यांचा समावेश आहे.

जानेवारी 2015 पासून अतिशय सखोल विचारमंथनातून आणि 700 जिल्ह्यामधील 2.5 लाख पंचायती आणि प्रस्तावांमधील सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त सूचनांचा विचार करून हा कार्यक्रम तयार करण्यात आला. एनईपीला कोणीही विरोध केलेला नसून हा सबका प्रयास चा परिणाम आहे, असे ते म्हणाले.

उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे आणि इतर देशांशी व्यापारविषयक वाटाघाटी करताना परदेशी विद्यापीठांशी देखील संलग्न होण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुक्त व्यापार करार आणि सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार याविषयीच्या वाटाघाटी युके, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा यांसारख्या देशांसोबत सुरू आहेत. आम्ही या सहकार्यामध्ये एनईपी हा मुख्य आधार मानून आणि फी कमी करण्याचे लक्ष्य ठेवून शिक्षण हे प्रमुख क्षेत्र म्हणून समाविष्ट करण्यासाठी आणि विद्यापीठांदरम्यान सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762014) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu