राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती 7 ऑक्टोबर रोजी चामराज नगर वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या अध्यापन रुग्णालयाचे उद्‌घाटन करणार

Posted On: 05 OCT 2021 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5  ऑक्टोबर 2021

राष्ट्रपती राम नाथ कोविंद 6 ते 8 ऑक्टोबर 2021 दरम्यान कर्नाटकला भेट देणार आहेत.

7 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रपती चामराजनगर येथील चामराजनगर वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या अध्यापन रुग्णालयाचे उद्‌घाटन करतील.

8 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रपती दक्षिणमनय श्री शारदा पीठम आणि शृंगेरी येथील शंकर अद्वैत संशोधन केंद्राला भेट देतील.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1761180) Visitor Counter : 54