माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डीडी काशीरवर लडाखी कार्यक्रमांना 30 मिनिटांची वाढीव वेळ
अनुराग ठाकूर यांनी लेहमध्ये नुकत्याच केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय
Posted On:
02 OCT 2021 4:45PM by PIB Mumbai
डीडी काशीरवर 1 ऑक्टोबर 2021 पासून लडाखी प्रसारणाचा कालावधी प्रतिदिन तीस मिनिटांवरून एक तास करण्यात आला आहे. अतिरिक्त प्रसारण कालावधीत बातम्या आणि लडाखी भाषेतील कार्यक्रमांचा समावेश असेल. स्थानिक संस्कृती, विकासात्मक उपक्रमांवरील कार्यक्रमांना मोठा मंच देण्यासाठी आणि केंद्रशासित प्रदेश लडाखमधील बातम्यांना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या लेह दौऱ्यादरम्यान जाहीर केले होते की लडाखच्या लोकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन डीडी काशीरवरील लडाखी बातम्या आणि कार्यक्रमांना अधिक वेळ दिला जाईल. पूर्वी डीडी काशीर वर लडाखी भाषेचे प्रसारण संध्याकाळी 6:30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असे 30 मिनिटांपर्यंत मर्यादित होते. अतिरिक्त तीस मिनिटांचे प्रसारण दुपारी 2:30 ते दुपारी 3 या वेळेत करण्यात येईल.
***
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760356)
Visitor Counter : 204