निती आयोग
निती आयोगाच्या महिला उद्योजकता व्यासपीठाने महिला ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड्स च्या पाचव्या आवृत्ती साठी अर्ज मागवले आहेत
Posted On:
02 OCT 2021 1:25PM by PIB Mumbai
स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी, नीती आयोगाचा प्रमुख उपक्रम, महिला उद्योजकता व्यासपीठ (WEP), या अमृत महोत्सवी उत्सवाचा भाग म्हणून 75 महिलांचा सत्कार करणार आहे. याअंतर्गत महिला ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड्स (डब्ल्यूटीआय) 2021 ने स्वयंपूर्ण व्यवसाय निर्माण करून आणि/किंवा अनोख्या व्यवसाय उपायांद्वारे आव्हानांवर मात करून उद्योग उभे करणाऱ्या
महिला उद्योजकांचा 'सशक्त और समर्थ भारत' याकरता दिलेल्या योगदानासाठी गौरव करून साजरा करणार आहे.
डब्ल्यूटीआय पुरस्कार भारतभरातील कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा समोर आणण्याचा आणि त्या गाथा साजरा करण्याचा नीती आयोगाचा प्रयत्न आहे. 2018 पासून, 'महिला आणि उद्योजकते' वर लक्ष केंद्रित करून महिला उद्योजकता व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली डब्लूटीआय पुरस्कार आयोजित केले जात आहेत.
यावर्षी, डब्ल्यूटीआय पुरस्कार संयुक्त राष्ट्र, सिस्को सीएसआर, फिक्की आणि ग्रांट थॉर्नटन भारत यांच्या संयुक्त सहभागाने दिले जाणार आहेत. याचे अर्ज https://wep.gov.in/ वर उपलब्ध आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. महिला उद्योजक स्वत: नामांकन दाखल करू शकतात किंवा इतरांचेही नामांकन करू शकतात. सार्वजनिक आणि सामुदायिक सेवा, उत्पादन क्षेत्र, बिगर -उत्पादन क्षेत्र, आर्थिक वाढ सक्षम करणारी आर्थिक उत्पादने, हवामान क्रिया, कला, संस्कृती आणि हस्तकला तसेच डिजिटल नवोन्मेषाला प्रोत्साहन देणाऱ्या सातपैकी एक किंवा अधिक श्रेणींमध्ये नामांकन करता येईल. अर्ज भरण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना आणि पात्रता निकष https://wep.gov.in/wep-faqs वर उपलब्ध आहेत.
अर्ज, शेवटच्या तारखेनंतर, स्वतंत्र मूल्यांकन, जूरी आणि सुपर ज्युरी फेऱ्यांचा समावेश असलेल्या तीन टप्प्यांच्या मूल्यांकन प्रक्रियेतून जातील. त्यातून 75 प्रेरणादायी महिला उद्योजकांची निवड केली जाईल. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे - ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असताना मंगळवार, 8 मार्च, 2022 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या विजेत्यांचा सत्कार केला जाईल.
सध्या, महिला उद्योजकता व्यासपीठावर 21,000 पेक्षा जास्त नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि 37 भागीदारांसह कार्यक्रम राबवले जात आहेत.
अधिक तपशीलांसाठी महत्वाचे दुवे:
https://wep.gov.in/.
https://www.niti.gov.in/women-entrepreneurship-platform
https://www.niti.gov.in/sites/default/files/2021-3/MovingTheNeedle_08032021-compressed.pdf
***
G.Chippalkatti/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760353)
Visitor Counter : 498