संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल बी आर कृष्णा यांनी सीआयएससीचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
01 OCT 2021 2:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2021
ठळक वैशिष्ट्ये :
- लढाऊ वैमानिक म्हणून केली सुरुवात, 38 वर्षांच्या कारकीर्दीत वैविध्यपूर्ण कामगिरी
- एनडीएचे माजी विद्यार्थी आणि 5,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव
- 1986 मध्ये शौर्य चक्र आणि 1987 मध्ये AVSM पुरस्काराने सन्मानित
एअर मार्शल बी आर कृष्णा यांनी 1 ऑक्टोबर 2021 रोजी चीफ ऑफ इंटेग्रेटिड स्टाफ टू चेयरमन, चीफ्स ऑफ स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. सीआयएससीनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर तिन्ही सेवादलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
1983, मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून रुजू झालेल्या एअर मार्शल कृष्णा यांनी 38 वर्षांच्या कारकीर्दीत वैविध्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. पात्र उड्डाण प्रशिक्षक आणि प्रायोगिक चाचणी वैमानिक, म्हणून त्यांनी भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यातील विविध प्रकारची लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर चे उड्डाण केले आहे. ऑपरेशनल, इंस्ट्रक्शनल आणि टेस्ट फ्लाईंगसह 5,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा त्यांना अनुभव आहे. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
आपल्या शानदार कारकीर्दीत, सीआयएससी यांनी असंख्य महत्त्वपूर्ण कमांड आणि स्टाफ नेमणुका केल्या आहेत. त्यांनी फ्रंटलाईन फायटर स्क्वाड्रन आणि एअर फोर्स टेस्ट पायलट्स स्कूलचे नेतृत्व केले. ते फॉरवर्ड एअर बेसचे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर, एअरक्राफ्ट आणि सिस्टीम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंटचे कमांडंट होते आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्वही त्यांनज केले होते.
एअर मार्शल बी आर कृष्णा हे हवाई मुख्यालयात सहाय्यक हवाईदल प्रमुख (प्रकल्प) आणि सहाय्यक हवाईदल प्रमुख (योजना) होते. एअर मार्शल म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकारी, दक्षिण पश्चिम एअर कमांड आणि हवाई परिचालन महासंचालक म्हणून काम पाहिले. सीआयएससीचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते वेस्टर्न एअर कमांडचे नेतृत्व करत होते. एअर मार्शलना 1986 मध्ये शौर्य चक्र आणि 1987 मध्ये विशिष्ट सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759938)
Visitor Counter : 303