रेल्वे मंत्रालय
राजकोट-कानालूस रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत 1,080.58 कोटी रुपये असेल आणि त्याची वाढीव / प्रकल्पपूर्तीची किंमत 1,168.13 कोटी रुपये असेल.
दुहेरीकरण होणाऱ्या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 111.20 किमी आहे
मार्ग दुहेरी केल्याने क्षमता वाढेल आणि मार्गावर अधिक फेऱ्या सुरू होऊ शकतात. राजकोट ते कानालूस या प्रस्तावित दुहेरीकरणामुळे सौराष्ट्र प्रदेशाचा सर्वांगीण विकास होईल
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2021 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2021
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने राजकोट-कानालूस रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत 1,080.58 कोटी रुपये असेल आणि त्याची वाढीव / प्रकल्पपूर्तीची किंमत 1,168.13 कोटी रुपये असेल. दुहेरीकरण होणाऱ्या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 111.20 किमी आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होईल.
विभागातील सध्याच्या माल वाहतुकीमध्ये प्रामुख्याने पेट्रोलियम, तेल आणि वंगण (पीओएल), कोळसा, सिमेंट, खत आणि अन्नधान्यांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या मार्ग संरेखनातून रेल्वे रुळाशेजारील खाजगी उद्योगांना मालवाहतूक केली जाते. रिलायन्स पेट्रोलियम, ESSAR तेल आणि टाटा केमिकल सारख्या मोठ्या उद्योगांद्वारे भविष्यातील भरीव वस्तूंची वाहतूक अपेक्षित आहे. राजकोट - कानालूस दरम्यान ब्रॉडगेज एकेरी मार्गाचा इष्टतम क्षमतेपेक्षा जास्त वापर झाला आहे आणि
कामकाज सुलभ करण्यासाठी अतिरिक्त समांतर ब्रॉडगेज मार्गाची आवश्यकता आहे. प्रवासी/मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या 30 जोड्या या विभागादरम्यान धावतात आणि देखभालीसाठी बंद चा काळ धरून विद्यमान मार्गाची वापर क्षमता 157.5% पर्यंत आहे. दुहेरीकरणानंतर माल आणि प्रवासी वाहतुकीवरील भार लक्षणीयरित्या कमी होईल. विभाग दुप्पट केल्याने क्षमता वाढेल आणि मार्गावर अधिकफेऱ्या सुरु केल्या जाऊ शकतात. राजकोट ते कानालूस पर्यंत प्रस्तावित दुहेरीकरणामुळे सौराष्ट्र प्रदेशाचा सर्वांगीण विकास होईल.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1759426)
आगंतुक पटल : 218