सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
एमएसएमई/उद्यम नोंदणीच्या नवीन ऑनलाइन प्रणालीने पार केला 50 लाखांचा टप्पा
Posted On:
28 SEP 2021 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2021
केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने एमएसएमई/उद्यम नोंदणीची नवीन ऑनलाइन प्रणाली, 1 जुलै, 2020 पासून लागू केली. ही प्रणाली वेळ आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर उतरली असून आतापर्यंत 50 लाखांहून अधिक एमएसएमईंनी इथे यशस्वीरित्या स्वतःची नोंदणी केली आहे. यामध्ये 47 लाखांहून अधिक सूक्ष्म संस्था आणि 2.7 लाख लघु एककांचा समावेश आहे.
एमएसएमई मंत्रालयाने एमएसएमईची व्याख्या आणि नोंदणी प्रक्रिया यात 1 जुलै, 2020 पासून सुधारणा केली आहे.
एमएसएमई/उद्यम नोंदणीसाठी एक नवीन पोर्टल (https://udyamregistration.gov.in)देखील सुरू केले आहे. तेव्हापासून हे पोर्टल सुरळीत काम करत आहे. हया पोर्टलचे सीबीडीटी आणि जीएसटी नेटवर्क तसेच जीईएमसह प्रवाहीपणे एकत्रिकरण केले आहे. या एकत्रीकरणाद्वारे, आता एमएसएमईचे सर्व कामकाज कागदरहीत झाले आहे.
एमएसएमई मंत्रालय आणि इतर सरकारी संस्थांचा लाभ घेण्यासाठी जे उद्योग अद्याप नोंदणीकृत नाहीत त्यांनी स्वतःची नोंदणी करावी. नोंदणी विनामूल्य आहे आणि ती फक्त सरकारी पोर्टलवरच केली पाहिजे. उद्योजक कोणत्याही मदतीसाठी, जवळच्या डीआयसी किंवा चॅम्पीयन्सच्या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधू शकतात किंवा https://champions.gov.in वर लिहून कळवू शकतात.
M.Chopade/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759008)
Visitor Counter : 322