आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 28 SEP 2021 1:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2021

 

गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 1 कोटींहून अधिक  मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 87.07 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या सलग 201 दिवसांपासून 20,000 पेक्षा कमी दैनंदिन रूग्णांची नोंद होत असून गेल्या 24 तासात 18,795 रुग्णांची नोंद झाली

सक्रीय रूग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी झाली असून सध्या ती 0.87% आहे आणि मार्च 2020 पासून ती सर्वात कमी आहे.

एकूण रुग्णसंख्या 2,92,206 असून ती गेल्या 192 दिवसांतील सर्वात कमी रूग्णसंख्या आहे.

रोगमुक्ती दर सध्या 97.81% आहे; मार्च 2020 पासून सर्वात उच्च स्तरावर आहे.

गेल्या 24 तासात 26,030 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यामुळे कोविडमुक्त रूग्णांची संख्या 3,29,58,002 इतकी झाली आहे. 

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.88%) गेले 95 दिवस 3% हून कमी

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.42%) असून गेले 29 दिवस 3% हून कमी

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 56 कोटी 57 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत

 

* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1758874) Visitor Counter : 203