संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही ऑफ ओमान यांच्यादरम्यान बिगरलष्करी, व्यापारी जहाजांच्यासंबंधी माहितीच्या आदानप्रदानाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या
Posted On:
27 SEP 2021 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2021
रॉयल नेव्ही ऑफ ओमानचे कमांडर रिअर अॅडमिरल सैफ बीन नासेर बीन मोहसिन अल-रहबी आणि भारतीय नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी 27 सप्टेंबर2021 रोजी बिगरलष्करी, व्यापारी जहाजांच्या ओळखनिश्चिती आणि हालचालीसंबंधी माहितीच्या आदानप्रदानाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नौदलप्रमुख करमबीर सिंग यांच्या ओमान भेटीदरम्यान मस्कत येथील सागरी सुरक्षा केंद्रात आज हा कार्यक्रम पार पडला.
भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही ऑफ ओमान यांच्यात झालेल्या या सामंजस्य करारामुळे भारतीय सागरी प्रदेशासाठीचे माहिती एकत्रीकरण केंद्र आणि ओमानचे सागरी सुरक्षा केंद्र यांच्या माध्यमातून परस्परांच्या व्यापारी नौकांच्या रहदारीच्या माहितीची देवाणघेवाण सुलभ होईल तसेच या प्रदेशातील सागरी सुरक्षितता आणि संरक्षण अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
* * *
M.Iyengar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758641)
Visitor Counter : 217