आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडविया आणि आरोग्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले नवी दिल्लीतील एम्सच्या 66 व्या स्थापना दिन समारंभांचे उद्घाटन

Posted On: 25 SEP 2021 3:42PM by PIB Mumbai

 

श्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि एम्सचे अध्यक्ष श्री मनसुख मांडवीय यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रविण पवार यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील एम्सच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. याच दिवशी एम्समध्ये पदवीपूर्व अध्यापनाची सुरुवात झाली होती आणि याच तारखेला 1956 मध्ये MBBS ची पहिली तुकडी होती.

 

यश हे ते संपादन करणाऱ्याची  अपेक्षा आणि जबाबदारी उंचावते या वस्तुस्थितीचे भान संस्थेचे अभिनंदन करताना, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी उपस्थितांना करून दिले. ते म्हणाले कि एम्स नवी दिल्ली हे देशभरात पसरलेल्या सर्व 22 नवीन एम्ससाठी दीपस्तंभ आहे. येथील विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्या समृद्ध अनुभवातून देशभरातील संस्थांना या एम्सच्या यशाचा कित्ता गिरवण्यासाठी मदत करू शकतात.

पाच दशकांहून अधिक काळ सार्वजनिक सेवेच्या अग्रभागी असणाऱ्या एम्स समुदायाच्या अविरत आणि निःस्वार्थ प्रयत्नांची प्रशंसा कार्यक्रमादरम्यान डॉ. पवार यांनी केली. अंत्योदय आणि सर्वोदय योजनांविषयी बोलताना, त्यांनी आपत्कालीन केंद्रात पहिल्या 24 तासात मोफत उपचार आणि सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी मोफत शस्त्रक्रिया केल्याबद्दल रुग्णालयाचे अभिनंदन केले आणि रुग्णालयातील सर्वात असुरक्षित अवस्थेत असलेल्या रूग्णांबद्दल सहानुभूती दाखवण्याचा सल्ला त्यांनी परिचारिका, रिसेप्शनिस्ट आणि कर्मचाऱ्यांना दिला.

 

कार्यक्रमात, श्री मांडवीय आणि डॉ. पवार यांनी प्राध्यापक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 33 पुरस्कार आणि पदके वितरित केली.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी RAK इमारतीत उच्च थ्रूपुट प्रयोगशाळेचे डिजिटल उद्घाटन केले जे 50 प्रयोगशाळा निदान चाचण्या करू शकते आणि 2-3 तासांत निकाल सादर करू शकते. राज्यमंत्र्यांसह, त्यांनी "डिजिटल आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण" ही संकल्पना असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सर्व विभागांनी संकल्पनेशी संबंधित विविध विषयांवर प्रदर्शन भरवले.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1758057) Visitor Counter : 160