माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लेह येथे पहिल्या हिमालय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केले


भारत जगातील आशय निर्मितीचा उपखंड बनू शकतो: ठाकूर

Posted On: 24 SEP 2021 8:12PM by PIB Mumbai

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज  लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह येथे सिंधू संस्कृती केंद्र येथे  पहिल्या हिमालय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केले. हा महोत्सव पाच दिवस चालणार असून भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल आयोजित केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाहा एक भाग आहे.  'जन भागीदारी' साठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने  चित्रपट महोत्सवात स्थानिक चित्रपट निर्मात्यांचा सक्रिय सहभाग असेल आणि 12 हिमालयीन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रतिभेचे दर्शन घडवेल.

 

समारंभात उपस्थितांना संबोधित करताना माहिती आणि प्रसारणमंत्री म्हणाले की, सध्याचे नरेंद्र मोदी सरकार पर्वतीय राज्यांना एक नवीन ओळख देईल आणि मंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे ध्येय साध्य करण्यासाठी अथकपणे काम करतील.

लडाखच्या लोकांच्या शौर्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, या प्रदेशातले लोक आपल्या सीमांच्या रक्षणासाठी आपल्या शूर सैनिकांच्या बरोबरीने उभे असतात.  शेरशाहसारखे चित्रपट अनेक पिढ्यांना युद्धात शूर वीराप्रमाणे लढलेल्या आपल्या  सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देतात. भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यात  अशा चित्रपटांचे मोठे योगदान आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या आकर्षणाबाबत बोलताना म्हणाले अनुराग ठाकूर म्हणाले की भारतात  ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत आहे. फक्त मोठ्या राज्यांसाठीच नाही तर देशातल्या छोट्या राज्यांसाठीही ही एक संधी आहे आणि नजीकच्या काळात  लडाख  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही ओळख निर्माण करेल.

ठाकूर म्हणाले की, जम्मू -काश्मीर आणि लडाखला चित्रपट प्रशिक्षण संस्थेशी जोडण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यांनी  जाहीर केले की ही कल्पना लवकरच अंमलात आणली जाईल.

उद्घाटन समारंभात 'शेरशाह' हा 'परमवीर चक्र' पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर आधारित चरित्रात्मक युद्धपट या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णुवर्धन आणि प्रमुख कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या उपस्थितीत दाखवण्यात आला.

लेहचे खासदार जम्यांग शेरिंग नामग्याल यांनी आपल्या भाषणात लडाखमध्ये हा पहिला 'हिमालयीन चित्रपट महोत्सव' आयोजित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1757846) Visitor Counter : 323