माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्येकडील प्रदेशात प्रसारभारतीचा डिजिटल विकास

Posted On: 21 SEP 2021 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  सप्टेंबर 2021

प्रसार भारतीच्या डिजिटल नेटवर्कने केवळ महसूल आधारित विकासाऐवजी सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करून भारतीय डिजिटल माध्यम उद्योगात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. डिजिटल जगातही सार्वजनिक प्रसारकाच्या कामाची जबाबदारी पार पाडत, ईशान्येकडील दुर्गम भागात प्रसार भारतीच्या डिजिटल मंचाने युट्यूबवर 220 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज आणि 1 दशलक्षहून अधिक ग्राहक मिळवून लक्षणीय कामगिरी नोंदवली आहे.

अशाच एका अलीकडील महत्त्वाच्या कामगिरीमध्ये, दूरदर्शन आयझवॉलच्या यूट्यूब चॅनेलने 1 लाख ग्राहकांची संख्या ओलांडली आहे. टेलीप्ले, टेलिफिल्म्स आणि फिल्म्सच्या शैलीतील उच्च दर्जाच्या सामुग्रीमुळे व्ह्यूज आणि ग्राहकांची संख्या वाढली आहे.

ईशान्य प्रदेशातील दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अनेक ट्विटर हँडल्सचे हजारो  फॉलोअर्स आहेत. अनेकांना ट्विटरवर ब्लू टिक व्हेरिफिकेशन आहे.

डीडी मिझोराम, डीडी गुवाहाटी, डीडी शिलाँग आणि ऑल इंडिया रेडिओ ईशान्य सेवेच्या यूट्यूब न्यूज चॅनेलची  मोठ्या प्रमाणावर ग्राहक संख्या आहे, ज्यात डीडी न्यूज मिझोराम आघाडीवर आहे.

प्रसार भारतीच्या या ईशान्य वाहिन्यांपैकी बहुतेक डिजिटल वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग आणि वाहिन्या बघण्याचा कालावधी लाखो तासांच्या घरात आहे. ज्यामध्ये मणिपूरची दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रे अग्रस्थानी आहेत.

 

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1756768) Visitor Counter : 289