वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पेट्रोलियम व स्फोटक द्रव्य क्षेत्रातील औद्योगिक सुरक्षेला मोठी चालना
द्रवरूप ऑक्सिजनसोबतच अर्गॉन, नायट्रोजन, द्रवरूप नायट्रोजन वायू या दाबाखालील वायूंची वाहतूक या आयएसओ कंटेनरमधून करण्यास परवानगी
Posted On:
21 SEP 2021 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2021
कोविड महामारी कालखंडात, भारत सरकारने आत्मनिर्भर भारत हा दृष्टीकोन दृढ करण्यासाठी अनेक पावले उचलली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार वृद्धी (DPIIT) विभागाने पेट्रोलियम संचस्थापन, स्फोटक निर्मिती उद्योग, सिलेंडर भरणा वा साठवणी केंद्रे अशा संवेदनशील ठिकाणी औद्योगिक सुरक्षेची खातरजमा करण्याच्या दृष्टीने अनेक सुधारणांची अंमलबजावणी केली. यामुळे सार्वजनिक सुरक्षेबरोबरच व्यवसायाचा खर्च कमी होऊन अंतर्गत व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना योग्य असे पर्यावरण तयार झाले. या संदर्भात, उद्योग आणि अंतर्गत व्यापार वृद्धी (DPIIT) विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम व स्फोटक द्रव्य सुरक्षा संस्थेसोबत (PESO) काम करत विभागाने स्फोटक पदार्थ, पेट्रोलियम तसेच धोकादायक रसायनांच्या उत्पादन, साठवण, वाहतूक आणि वापर यासंदर्भात काही मानक नियम (SOP) तयार करून त्यांची अंमलबजावणी केली. उद्योग आणि अंतर्गत व्यापार वृद्धी (DPIIT) विभागाच्या अतिरिक्त सचिव सुमिता देवरा यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या संदर्भात, स्थिर व मोबाईल प्रेशर व्हेसल्स (Unfired) [SMPV(U)], कॅल्शियम कार्बाईड, अमोनियम नायट्रेट, गॅस सिलेंडर्स, पेट्रोलियम व स्फोटके या पाच मुख्य क्षेत्रांशी संबधित नियमांचा आढावा घेतला. नंतर सर्व संबंधितांशी तसेच खाजगी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि इतर मंत्रालये यांच्या प्रतिनिधींशी यावर सविस्तर चर्चा केली. सर्व संबधितांशी सखोल चर्चा व जानेवारी 2021 पासून अनेक महिन्यांचे फीडबॅक यावरून ठळक नियमात सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणा अंतिम टप्प्यात निश्चित करण्यात येऊन स्थिर व मोबाईल प्रेशर व्हेसल्स (Unfired) [SMPV(U)], कॅल्शियम कार्बाईड, अमोनियम नायट्रेट या तीन प्रकारांसाठी 31 ऑगस्ट 2021 रोजी त्या अधिसूचित करण्यात आल्या. 25 जून 2021 रोजी गॅस सिलेंडरसंदर्भातील नियम अधिसूचित करण्यात आले.

सविस्तर माहितीसाठी इंग्लिशमधील वृत्त येथे पहावे.
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1756733)
Visitor Counter : 288